विद्यार्थ्यांच्या वादातून प्राचार्यांना मारहाण

| नाशिक | वृत्तसंस्था |

नाशिकरोड येथील बिटको महाविद्यालयातील प्राचार्यांच्या कार्यालयात घुसून विद्यार्थ्यांसह त्याच्या पालकाने प्राचार्यांसह कर्मचारी व विद्यार्थ्यांना मारहाण केल्याची घटना गुरुवारी (दि. 22) घडली. यात महाविद्यालयातील कर्मचारी, विद्याथी व प्राचार्य जखमी झाले असून, उपनगर पोलीस ठाण्यात संशयित विद्यार्थ्यासह त्याच्या पालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी विजय बोराडेसह एका संशयिताला ताब्यात घेतले आहे.

याबाबत प्राचार्य डॉ. मंजुषा कुलकर्णी यांनी म्हटले की, दोन विद्यार्थ्यांमध्ये दुपारी वाद झाला. तो मिटवण्यासाठी कर्मचारी दोघांना माझ्या कार्यालयात घेऊन आले. त्यांना मी समजावून सांगत असताना दमदाटी करत बेसबॉल स्टीक व लाकडी दांडक्यांनी देवडे व विद्यार्थी अभयसिंह चौहान यांना मारहाण करून गंभीर जखमी केले. एक कर्मचारी आणि विद्यार्थी गंभीर जखमी झाला. मलाही मार लागला. नंतर हल्लेखोरांनी प्राचार्य कुलकर्णी यांना मारहाण करत कार्यालयात तोडफोड केली. विजय बोराडे याने आपण मनसेचा कार्यकर्ता असल्याचे सांगितले असता पदाधिकाऱ्यांनी मात्र बोराडेशी कुठलाही संबंध नसल्याचे म्हटले. पोलिसांनी गुन्हा दाखल करून विजय बोराडे व अन्य एकाला ताब्यात घेतले आहे.

मी महाविद्यालयात दुपारी डबा खात असताना मयूर बोराडे हा विद्यार्थी आला. गैरसमजातून त्याने मला मारहाण केली. मी प्राचार्य कार्यालयात तक्रार करायला गेलो असता मयूर बोराडे, त्याचे वडील विजय बोराडे आणि अन्य एक व्यक्ती तेथे आला. त्यांनी बेसबॉलची बॅट, रॉडने मला मारहाण सुरू केली. डोक्यात घाव लागल्याने मी बेशुद्ध पडलो

जखमी विद्यार्थी अभयसिंह चौहान
Exit mobile version