विधानसभेचे आजचे कामकाज स्थगित

| मुंबई | प्रतिनिधी |

महाराष्ट्र विधिमंडळ अधिवेशनात एकीकडे सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण रंगताना दिसत असताना दुसरीकडे विधानपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने वातावरण तापू लागले आहे. 11जागांसाठी 12 अर्ज आल्याने ही निवडणूक होणार असून सर्वच पक्षांनी आपापल्या विधानसभा आमदारांना क्रॉसव्होटिंगपासून दूर ठेवण्यासाठी ‘हॉटेल पॉलिटिक्स’ सुरू केले आहे. त्यातच अधिवेशनात वरळी हिट अँड रन प्रकरणाचे पडसादही उमटताना पाहायला मिळत आहेत. एकीकडे विधानसभेत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून गोंधळ झालेला असताना दुसरीकडे विधानपरिषदेतही तेच चित्र दिसून आले. आरक्षणाच्या मुद्द्यावरून झालेल्या गोंधळामुळे विधानपरिषदेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. याच मुद्द्यावरून विधानसभेचे कामकाज आधी 5 मिनिटं, नंतर 10 मिनिटं आणि तिसऱ्यांदा थेट पाऊण तासासाठी तहकूब करावे लागले.

Exit mobile version