भूसंपादनाची प्रक्रिया मंदावली

| माणगाव । वार्ताहर ।

माणगावात तीन्ही महत्त्वाचे विकसनशील प्रकल्पाचे काम गेल्या कांही वर्षापासून सुरु आहे. त्यापैकी कोकण रेल्वे प्रकल्पाचे बहुतांशी काम पूर्ण झाले आहे. तर कॉरीडोर व महामार्गासाठी भूसंपादन करण्याची प्रक्रिया सुरूच आहे. इंदापूर ते टेमपाले दरम्यानच्या महामार्गालगत असणार्‍या शेतकरी व बाधितांना भूसंपादनाच मोबदला देण्याचे काम अंतिम टप्यात आले आहे. कांही ठिकाणी बाधित व शेतकर्‍यांना मोबदला अदा झाला नसल्याने व त्या मोबदला वाटपात तांत्रिक अडचणी असल्याने ही प्रक्रिया मंदावली असून शेतकरीही मेटाकुटीला आला आहे. तर कॉरीडोर भूसंपादनाचीही अशी स्थिती आहे. या पूर्वीच्या प्रांत अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी प्रशाली जाधव दिघावकर यांनी भूसंपादनाची प्रक्रियेला गती दिली होती. मात्र सध्या ही प्रक्रिया मंदावली आहे. या बाबत नागरीकातून नाराजी पसरली आहे.

पर्यायाने माणगाव तालुक्याचा विकास हि तितक्याच जलद गतीने होत आहे. त्यामुळे माणगाव तालुका हा आर्थिक उलाढालीचे केंद्र बनत आहे. वाढत्या औद्योगिकिरणाच्या दळणवळणात भर घातली ती कॉरीडोर, लोहमार्ग, महामार्ग. त्यामुळे माणगावचे उज्ज्वल भविष्य ठरविणारा काळ कांही अंतरावर येऊन ठेपला आहे.

तालुक्यातील 22 गावातील सुमारे 5000 हेक्टर क्षेत्राचे भूसंपादनाचे काम सुरु असून मोबदला वाटपाचे काम 70 टक्के झाले असून या भूसंपादन प्रकियेत बागायत जमीन, तसेच खातेदारांच्या आपापसातील वाद, यासारख्या तांत्रिक अडचणीमुळे भूसंपादनाची प्रक्रिया मंद गतीने सुरु आहे.

Exit mobile version