। खांब । वार्ताहर ।
रोहा तालुक्यातील तळवली तर्फे अष्टमी येथे संपन्न झालेल्या कृषी विषयक कार्यक्रमाला शेतकरी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. तालुका कृषी कार्यालयांतर्गत संपन्न झालेल्या या कार्यक्रमात कृषी सहायिका पल्लवी उबाळे यांनी उपस्थित शेतकरी वर्गाला बहुमोल मार्गदर्शन केले. यावेळी सरपंच रविंद्र मरवडे, राम मरवडे, वसंत मरवडे, शंकर मरवडे, रामचंद्र बामणे, रामचंद्र मरवडे, प्रशांत नागावकर, अनंता मरवडे, काशिराम गायकर, सुभाष बामणे, सुनील मरवडे, मारूती बामणे, राजेंद्र मरवडे, वामण नागावकर, मोरेश्वर मरवडे, गजानन गायकर, जनार्दन नागावकर, देविदास मरवडे, सिताराम बामणे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात कृषी सहायिका पल्लवी उबाळे यांनी खरिप हंगामातील विविध पीक लागवडीची तयारी, मशागत, शेती क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, नवनवीन बी बियाणे याबाबत मार्गदर्शन केले.