नवी मुंबईच्या विद्यार्थिनींचा डंका

राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेत प्रकल्पाची निवड
| नवी मुंबई | प्रतिनिधी |
भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागातर्फे नाशिक येथे नुकतीच राज्य पातळीवरील 31 वी राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेची पहिली फेरी पार पडला होती. या परिषदेत नवी मुंबई महापालिका शाळा क्रमांक 46 गोठीवली येथील पल्लवी सोळंखे व प्रिती राठोड या दोन विद्यार्थिनींनी सादर केलेल्या प्रकल्पाची राष्ट्रीय पातळीवर निवड झाली आहे.

राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद 2023 या स्पर्धेत 4,500 हून अधिक विज्ञान प्रयोगांचा सहभाग आहे. यामध्ये 36 जिल्हे सहभागी आहेत. जिल्हास्तरीय फेरीतील 188 प्रकल्पांची निवड होऊन त्यापैकी 52 प्रकल्पांची राज्यस्तरीय फेरीमध्ये निवड झालेली आहे. त्यापैकी 30 प्रकल्पांची राष्ट्रीय स्तरावर निवड करण्यात आली आहे. जिज्ञासा ट्रस्ट यांच्या माध्यमातून ही स्पर्धा घेण्यात आली होती. यातील सर्वोत्तम दहा प्रकल्पांमध्ये नवी मुंबई महापालिकेच्या विद्यार्थिनींनी तयार केलेल्या अभिनव प्रकल्पाची निवड झाली आहे. त्यात नवी मुंबईच्या अंश शर्मा व विराज गुरव या विद्यार्थ्यांनीही ङ्गआजोबांची आधुनिक काठीफ हा प्रकल्प सादर करून कल्पकतेचे दर्शन घडवले आहे.

शास्त्रीय दृष्टिकोनातून कल्पकता
प्रसाधनगृहात विशेषत्वाने महिलांना जाणवणाऱ्या अडचणी, त्यामुळे होणारा त्रास याबाबत उपाय शोधण्याच्या दृष्टीने दोन विद्यार्थिनींनी विज्ञानाची कास धरत केलेला विचार व शोधलेला उपाय ही त्यांच्यामधील कल्पकता आणि शास्त्रीय दृष्टिकोन दाखवणारी गोष्ट आहे. महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी त्यांचे विशेष कौतुक केले. राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेचे अध्यक्ष सुरेंद्र दिघे तसेच राज्य समन्वयक विश्वास कोरडे यांनीही मुलांच्या कल्पकतेची प्रशंसा केली.

Exit mobile version