आजही जनतेचा पक्षावर विश्वास: सुरेश खैरे

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

शेतकरी कामगार पक्ष कायमच शेतकरी, कष्टकरी, कामगारांचा आवाज बनला आहे. वेगवेगळी आंदोलने, लढाईतून सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम पक्षाच्या माध्यमातून केले आहे. स्वार्थासाठी अनेक जण पक्ष बदलत आहेत. मात्र, शेतकरी कामगार पक्षावर जनतेचा विश्वास आजही आहे, असे प्रतिपादन शेकाप जिल्हा चिटणीस सुरेश खैरे यांनी केले. शेतकरी कामगार पक्षाने अनेक प्रश्नांची सोडवणूक केली आहे, असे सांगत त्यांनी पक्षाचा अहवाल वाचन केले. स्मार्ट मीटर, वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबविण्यापासून केलेल्या कार्याच्या अहवालाचे त्यांनी वाचन केले.

Exit mobile version