सार्वजनिक रहदारीचा मार्ग गेट टाकून अडविला

विकसकाचा ग्रामस्थांना शस्त्रास्त्रांचा धाक
| पाली/बेणसे | वार्ताहर |
एका विकासकाने खोटी कागदपत्रे सादर करून अनधिकृत गेट उभे करून सुधागड तालुक्यात अडूळसे ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामस्थ आणि शेतकरी यांना आपल्या हक्काच्या सार्वजनिक वाहतुकीस अडथळा आणला आहे. याबरोबरच शस्त्रास्त्राचा धाक दाखवून विकसकाने ग्रामस्थांना वेठीस धरले आहे. या विरोधात ग्रामस्थांनी संबंधित तहसील कार्यालयात धाव घेतली आहे. अनधिकृत गेट काढण्याचे आदेश दिले आहे. मात्र या आदेशाला संबंधित विकासकाने केराची टोपली दाखवली आहे. परिणामी सोमवार (दि. 27) पर्यंत हा गेट न काढल्यास ग्रामस्थ आंदोलन करणार आहेत.

याबाबत ग्रामस्थांनी केलेले निवेदन व दिलेल्या माहितीनुसार रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यात अडूळसे ग्रामपंचायत मधील शरदनगर, गौळमाळ धनगरवाडा, गौळमाळ ठाकूरवाडी, पायरीचीवाडी येथील आणि शेतकरी गेली अनेक वर्षे या आपल्या गावाकडे जाणार्‍या रस्त्याने ये जा करीत होते. पण काही वर्षांपूर्वी स्वतः ला कॅप्टन म्हणजेच रिटायर्ड कॅप्टन सांगणारे रणजित प्रधान यांनी रायगड पाटबंधारे विभाग, कोलाड यांच्या कडे खोटी कागदपत्रे सादर करून फ्रान्सिस वर्गीस यांच्या मालकी हक्काच्या जागेतून जाणार्‍या मार्गावरील पुलाचे काम स्वखर्चाने करून फसवणूक केली आहे.

तसेच याबाबत स. नं. 137 या उतार्‍यावर फ्रान्सिस वर्गीस यांच्या कडे ग्रामपंचायत अडूळसे यांना 20/10/2021 रोजी लेखी पत्राद्वारे सदर गेटशी माझा कोणताही सबंध नाही. त्या गेटचे बांधकाम मी केलेले नाही किंवा कोणालाही संमती दिलेली नाही असे कळवले असताना रणजित प्रधान हे दमदाटी करून शस्त्रांचा दाख दाखवून आणि शेतकर्‍यांना धमकावत आहेत. नमूद सर्व वस्तुस्थिती व मामलेदार न्यायालय अधिनियम 1906 चे कलम 5(2) नुसार सर्व तरतुदींना अधिन राहून तसेच सर्व मुद्दे विचारात घेऊन तत्कालीन कार्यकारी दंडाधिकारी सुधागड यांनी सर्व अडूळसे ग्रामस्थ आणि शेतकर्‍यांकरीता सदर अनधिकृत गेट तोडून रस्ता कायमचा मोकळा करण्यात यावा असे आदेश पारित केले आहेत.

देखील रणजित प्रधान हे कार्यकारी दंडाधिकारी सुधागड यांचे आदेश धुडकावून येणार्‍या जाणार्‍या अडूळसे ग्रामपंचायत मधील ग्रामस्थ, महिला आणि शेतकर्‍यांना शिवीगाळ करून शस्त्रांचा धाक दाखवीत भीतीचे वातावरण निर्माण करीत आहे. सदर स्थळावर भेट देतांना मनसे उपजिल्हा अध्यक्ष संदिप ठाकूर, माजी सरपंच शरद फोंडे, माजी सरपंच भाऊराव कोकरे, माजी उपसरपंच संतोष मनसे पाली शहर अध्यक्ष दिपेश लहाने, शेखर चव्हाण आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

संबंधित आदेश माझ्या कार्यकाळातील नाहीत. हा आदेश पाहून तसेच स्थळ पाहणी करून या प्रकरणासंदर्भात सखोल माहिती घेणार आहे. – उत्तम कुंभार, तहसीलदार, पाली-सुधागड

Exit mobile version