आरोग्य केंद्राचा प्रश्‍न मार्गी लागणार

। जेएनपीटी । वार्ताहर ।
दिघोडे येथिल प्रस्तावित प्राथमिक आरोग्य केंद्राचा प्रश्‍न मार्गी लागण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. रायगड जिल्हा परिषदेने निश्‍चित केलेल्या जागेची सोमवार, दि. 28 रोजी कोप्रोली आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राजाराम भोसले यांच्या आणि पोलिसांच्या उपस्थित मोजणी करण्यात आली. त्यामुळे गेली कित्येक वर्षापासून मंजूरी मिळालेल्या दिघोडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम सुरू होण्याची शक्यता दिसत आहे. जागेची हद्द निश्‍चित झाल्यानंतर तेथे प्रत्यक्षात कामाला सुरूवात होण्याची शक्यता आहे.

Exit mobile version