अडथळा शर्यतीत पटकावलं रौप्यपदक
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
चीनमध्ये सुरु असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंकडून पदकांची लूट सुरु आहे. भारतीय खेळाडू ज्योती याराजीच्या तत्परतेमुळे चीनच्या खेळाडूची चोरी पकडली गेली. ज्योतीने तात्काळ याबाबत आवज उठवला अन् चीनच्या खेळाडूचा डाव हाणून पाडला.
ज्योती याराजी हिला महिला 100 मीटर अडथळा स्पर्धेत रौप्य पदक मिळविले. आधी ज्योतीला कांस्य पदक देण्यात येणार होते, पण अपग्रेट करण्यात आले. चीनची महिला खेळाडूने रडीचा डाव केला होता. त्यानंतर स्पर्धेत मोठा वाद उफळला होता. भारताच्या ज्योती याराजी हिने चीनच्या खेळाडूची चोरी पकडली, अन् परीक्षकाच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर ज्योतीला रौप्यपदक देण्यात आले. दोषी आढळलेल्या चीनच्या खेळाडूचे पदक काढून घेण्यात आले.
या स्पर्धेत चीनची यानी वू हिने चुकीची सुरुवात केली. वेळेआधीच काही सेकंद तिने धावण्यास सुरुवात केली होती. याबाबत ज्योतीने आवाज उठवला. त्यानंतर चीनच्या खेळाडूने आपली चूक मान्य करण्याऐवजी ज्योतीवरच आरोप केले. ज्योतीने चुकीची सुरुवात केली, असा आरोप चीनच्या यानी वू हिने केला होता. त्यानंतर मोठा गोंधळ झाला. पंचांनी ज्योतीला स्पर्धेतून बाद केले. पण ज्योतीने मैदान सोडले नाही. ज्योती आपल्या मतावर ठाम राहिली. त्यानंतर पंचांनी याचा रिप्लेमध्ये पाहिला.
रिप्लेमध्ये चीनच्या यानी वू हिनेच चुकीची सुरुवात केल्याचे दिसले. पंचांनी चीनच्या खेळाडूला दोषी ठरवले अन् स्पर्धेतून बाद ठरवले. तिच्याकडून पदकही काढून घेतले. भारताच्या ज्योतीने हिंमत दाखवत आवाज उठवला, त्यामुळे चीनच्या खेळाडूविरोधात कारवाई करण्यात आली.