अलिबागची खरी ओळख म्हणजे रामनाथ

आ. जयंत पाटील यांचे गौरवोद्गार
रामनाथ येथील गावदेवी मंदिराचा जिर्णोद्धार
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
केलेल्या विकास कामांची जाणीव रामनाथकर ठेवत असल्याने या भागावर आपले विशेष प्रेम आहे. सर्वांना सामावून घेत गावाचे गावपण टिकवलेल्या अलिबागची खरी ओळख रामनाथ होती. रामनाथकरांनी खर्‍या अर्थाने गावपण टिकवून एकाच विचारामध्ये सर्वांना सामावून घेण्याची कल्पकता शिकण्यासारखी असल्याचे गौरवोद्गार शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी काढले.
रामनाथ येथील श्री गावदेवी मंदीराचा जिर्णोध्दार माजी नगराध्यक्ष स्व. नमिता प्रशांत नाईक यांच्या स्मरणार्थ नगर अध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या माध्यमातून करण्यात आला असून या गावदेवी मंदीराचे लोकार्पण शुक्रवारी लोकार्पण शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आ. जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला नगराध्यक्ष प्रशांत नाईक, उपनगराध्यक्षा अ‍ॅड. मानसी म्हात्रे, माजी नगरसेवक तथा काँग्रेसचे प्रदेश सचिव अ‍ॅड. प्रवीण ठाकूर, रायगड बाजारचे चेअरमन नृपाल पाटील, जिल्हा महिला आघाडी प्रमुख नगरसेविका चित्रलेखा पाटील, अ‍ॅड परेश देशमुख, अलिबाग नगरपरिषदेचे गटनेते प्रदीप नाईक आदी प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते.
आ. जयंत पाटील पुढे म्हणाले की, हा भाग म्हणजे अलिबागची सुरुवात, रामनाथ म्हणजे खर्‍या अर्थाने मुळ अलिबाग आहे. बागायतदार अलिने जागा दिल्याने गावाचे नाव अलिबाग झाले. रामनाथवर माझे विशेष प्रेम आहे. या नगरीवर शेकापक्षाचे राज्य आहे त्याची सुरुवात रामनाथने केलेली आहे. आणि ती कधीही सोडली नाही. पहिली पेटी फुटल्यानंतर सर्व जागा शेकापक्षाच्याच ताब्यात जागा राहिल्या आहेत. कुंभार समाज मोठया प्रमाणावर आहे. या गावाने गावकी कायम ठेवल्याने या गावाबद्दल आपुलकी व्यक्त करतानाच आ. जयंत पाटील यांनी धन्यवाद दिले. गावकी म्हणून बाहेरुन आलेल्या लोकांना एका विचारामध्ये सामावून घेण्याचे काम रामनाथकरांनी केले. एका विचाराबरोबर संपूर्ण गावकी एकत्र ठेवण्याची कल्पकता रामनाथकरांकडून शिकायला पाहिजे. काम कशी करायची पहिला विकासाचा अग्रहक्क रामनाथला देत असल्यचे त्यांनी आवर्जून नमुद केले. रामनाथ आणि कोळीवाडा या दोन गावक्या अलिबागमध्ये असल्याचेही त्यांनी यावेळी आवर्जून उल्लेख केला. एक वेगळे काम रामनाथमधून केले जात आहे. ही गावकीची परंपरा कायम ठेवा. रामनाथ हे मुळ रामनाथ आहे हे खरे अलिबाग आहे हे पुढच्या पिढीला हा इतिहास समजण्यासाठी त्याचे जतन होणे आवश्यक असल्याचे मतही जयंत पाटील यांनी व्यक्त केले. रामनाथमधील प्रत्येक कार्यक्रमातील महिलांच्या पुढाकाराबाबत त्यांनी कौतुक केले. रामनाथमधील बगिचा अधिक चांगल्यापद्धतीने विकसित करण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी आमदार निधी देण्याची तयारीही त्यांनी यावेळी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्यासोबत व्यक्त केली. यावेळी त्यांनी सुंदर मंदिराच्या उभारणीबद्दल नगराध्यक्ष प्रशांत नाईक तसेच ठेकेदार यांना धन्यवाद दिले.
यावेळी प्रदीप नाईक यांनी आपले मनोगत व्यक्त करताना अलिबाग नगरपरिषदेचे बजेट कमी असूनही विकासकामांसाठी शेकाप नेते आ जयंत पाटील, माजी मंत्री मीनाक्षी पाटील, माजी आमदार पंडित पाटील यांच्या आमदार निधीतून कामे केली जात असल्याचे सांगत त्या माध्यमातूनच विकास कामे मार्गी लागत असल्याचेही नमुद केले. अ‍ॅड प्रविण ठाकूर यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या नेतृत्वाखाली शहराचा विकास होत असून कोव्हीड काळात देखील चांगले कार्य करण्यात आल्याचे सांगितले. तसेच चित्रलेखा पाटील यांनी कोव्हीड सेंटर, लसीकरण केंद्र सुरु करुन जनतेला चांगला आधार दिला. अलिबागकरांनी सर्व संकटांना एकत्रित तोंड दिले. जुनी मंदिरे पर्यटकांचे आकर्षण ठरत असल्याचेही ते म्हणाले. याप्रसंगी माजी उपसभापती प्रवीण घरत, नंदकुमार पालवनकर, माजी उपनगराध्यक्ष वसंत चौलकर नगरसेवक अ‍ॅड गौतम पाटील, सुषमा पाटील, राकेश चौलकर, वृषाली ठोसर, सुरक्षा शाह, अनिल चोपडा, महेश शिंदे, प्रिया वेलकर, राजश्री पेरेकर, संजना किर, डॉ रमेश वार्डे, पल्लवी आठवले, आदी उपस्थित होते. शशिकांत गुरव यांनी आभार मानले तर सूत्रसंचालन नंदकुमार तळकर यांनी केले. कार्यक्रमासाठी नित्यानंद पाटील, मधुकर गुरव, रोहिदास मांगरुळकर, दत्तात्रय नागावकर, सुरेश पालवनकर, संतोष चौलकर, सचिन गुरव, शशिकांत गुरव, हर्षल पाटील आदींसह सर्व रामनाथकर ग्रामस्थ व महिलांनी परिश्रम घेतले.

Exit mobile version