आगामी विश्वचषकाच्या लोगोचे प्रकाशन

वेस्ट इंडिज, अमेरिकेत होणार स्पर्धा

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषक स्पर्धा वेस्ट इंडिज आणि अमेरिकेमध्ये आयोजित करण्यात आली आहे. दरम्यान, आयसीसीने आगामी स्पर्धेचा नवीन लोगोचे प्रकाशन केले आहे. आयसीसीने एक व्हिडीओ शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. त्याचबरोबर जॉन्स नावाच्या एका युजर्सने सोशल मीडियावर नवीन लोगोचे छायाचित्र शेअर केले आहे. त्याने हा फोटो एक्सवर शेअर करताना यूजर्सनी लिहिले आहे की, ‌‘टी-20 विश्वचषक 2024 चा लोगो’ सर्वांच्या नजरा अमेरिका आणि वेस्ट इंडिजवर आहेत.

आयसीसीने आगामी स्पर्धेशी संबंधित एक व्हिडीओही शेअर केला आहे. शेअर केलेल्या व्हिडिओच्या माध्यमातून आगामी सीझनच्या लोगोची माहिती देण्यात आली आहे. हा व्हिडीओ शेअर करताना बोर्डाने लिहिले आहे की, ‌‘बॅट, बॉल आणि एनर्जी या तीन गोष्टी टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटची व्याख्या सांगतात! आयसीसी टी-20 विश्वचषकासाठी एक आकर्षक नवीन रूप.

जॉन्स नावाच्या युजरने आपल्या दुसऱ्या पोस्टमध्ये आतापर्यंतच्या लोगोंचा फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये 2007 पासून ते 2014 पर्यंच्या लोगोंचा समावेश आहे. सर्वात पहिला टी-20 विश्वचषक 2007 साली दक्षिण आफ्रिकेत आयोजित केला होता. त्यानंतर इंग्लंड (2009), वेस्ट इंडिज 2010, श्रीलंका (2012), बांगलादेश (2014), भारत (2016), ऑस्ट्रेलिया (2022) आता वेस्ट इंडिज आणि अमेरिका (2024) येथे आयोजन होणार आहे.

Exit mobile version