| नेरळ | प्रतिनिधी |
तालुक्यातील टाकवे येथील आदिवासी तरुण गणेश पवार हा कामासाठी घराबाहेर निघाला आणि महापुराच्या पाण्यात वाहून गेला. पोहता येत असल्याने उल्हास नदीला पूर आलेला असतानादेखील जिद्दीने नदीतून वाट काढत झाडाची मदत घेतली आणि तेथे तग धरून थांबून राहिला. त्यानंतर अपघातग्रस्त मदतीसाठी या रेस्क्यू टीमने वाहत्या पाण्यात उतरून त्या तरुणाला सुखरूप बाहेर काढले. या टीमच्या सदस्यांनी गुरुनाथ साठलेकर यांच्या नेतृत्वाखाली किमान 300 मीटर आत जाऊन त्या तरुणाला बाहेर सुरखरुप काढले. नदीबाहेर आल्यावर गणेश पवारने खोपोली येथून आलेल्या टीमने मला वाचविण्यासाठी पाण्यात उड्या घेतल्या हे कधीही विसरू शकत नाही, अशी प्रतिक्रिया दिली. तसेच प्रशासनाचेही आभार मानले.







