असनी चक्रीवादळाचा धोका वाढला

प.बंगाल, ओडिसात सतर्कतेचे आदेश
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

असनी चक्रीवादळ शनिवारी संध्याकाळी अंदमान समुद्रातून बंगालच्या उपसागराकड सरकले असून बंगाल, ओडिशा आणि झारखंडमधील अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. हे चक्रीवादळ ओडिशा किंवा आंध्रच्या किनारपट्टीवर धडकू शकते, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाच महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी व्यक्त केला. या दरम्यान, वार्‍याचा वेग 75 ते 90 किमी प्रति तास इतका असू शकतो.

ओडिशाचे विशेष मदत आयुक्त पीके जेना यांनी सांगितले की, संभाव्य चक्रीवादाळाच्या पार्श्‍वभूमीवर यंत्रणा सतर्क करण्यात आली असून,मच्छिमारांना समुद्रात जाण्यास मज्जाव करण्यात आला आहगे. हे. राज्य सरकार अलर्ट मोडवर आहे. कोणत्याही अनुचित प्रकाराला तोंड देण्यासाठी आम्ही पूर्ण तयारी केली आहे, असे ते म्हणाले.

या राज्यांवर परिणाम होणार
असनी चक्रीवादळाचा प्रभाव ओडिशा व्यतिरिक्त पश्‍चिम बंगाल, सिक्कीम, आसाम, आंध्र प्रदेश, झारखंड, ईशान्येकडील अनेक राज्यांमध्ये दिसून येईल. खचऊ ने ओडिशासाठी यलो अलर्ट जारी केला आहे.

पाच महिन्यांनी चक्रीवादळ
याआधी डिसेंबर 2021 मध्ये जावाद चक्रीवादळ भारतात आले होते. त्याच वेळी, गुलाब चक्रीवादळ सप्टेंबर 2021 मध्ये धडकले, तर मे 2021 मध्ये, यास चक्रीवादळाने बंगाल, बिहारसह अनेक राज्यांमध्ये कहर केला होता.

Exit mobile version