| माणगाव | प्रतिनिधी |
मुसळधार पावसामुळे इंदापूर शासकीय आरोग्य केंद्र आणि विश्रामगृहाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पाणी साचून राहात आहे. त्यामुळे या ठिकाणी जाणाऱ्या रुग्णांना व नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
दरम्यान, पाणी साचल्यामुळे पंचक्रोशीतील रुग्णांना पाण्यातून आरोग्य केंद्रापर्यंत उपचारासाठी रोज जावे लागत आहे. या ठिकाणी पावसाळी पाण्याच्या विसर्गात अडथळे आल्यामुळे पाण्याचा निचरा होत नाही, त्यामुळे पाणी साचून राहात आहे. या ठिकाणी पाण्याचा विसर्ग पूर्ववत करावा, अशी मागणी पंचक्रोशीतील नागरिक करत आहेत.
इंदापूर विभागातील रुग्ण प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी येतात, मात्र पावसाळ्यात या ठिकाणी जाणाऱ्या रस्त्यावर दीड फूट पाणी साचते व रुग्णांना, नागरिकांना त्रास होतो. या ठिकाणी पाण्याचा योग्य विसर्ग करून नागरिकांचा त्रास कमी करावा.
राजेश कोलवणकर, सामाजिक कार्यकर्ते, इंदापूर