महाडमध्ये रस्ता खचला; मुंबई-गोवा महामार्ग ठप्प

वाकण नाक्यावरती महाड बाजुकडे जाणार्‍या वाहनांचा खोळंबा
। सुकेळी । दिनेश ठमके ।
रायगडमध्ये मुसळधार पावसाने अक्षरश: हाहाकार माजवला आहे. महाडमधील तळईवाडी येथे दरड कोसळुन अनेक जणांचा जीव गेल्याची मोठी दुर्घटना घडली आहे. तसेच महामार्गावर अनेक ठिकाणी रस्ते व मोर्‍या वाहुन गेल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. महाड येथे देखील मोठ्या प्रमाणात महामार्ग खचल्यामुळे महाडकडे जाणारी वाहतुक वाकण नाक्यावरती पुर्णत: बंद करण्यात आली होती.

सतत चार ते पाच दिवसांपासुन सुरु असलेल्या मुसळधार पावसाने संपुर्ण कोकणासह रायगड जिल्ह्यामध्ये हाहाकार केला आहे. अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले तर महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी निर्माण झाली होती. तसेच महाड येथे झालेल्या मोठ्या दुर्घटनेमुळे व अनेक ठिकाणी रस्त्यावर आलेले पाणी व वाहुन गेलेल्या रस्त्यामुळे महामार्गावर काही ठिकाणी वाहतुक बंद करण्यात आली.

वाकण, सुकेळी, कोलाड येथे कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. वाहतुक व्यवस्थितरीत्या कशी सुरु राहील, यासाठी पोलिसांचे अथक प्रयत्न सुरू होते. वाहतुक सुरळीत राहण्यासाठी वाकण नाका येथे नागोठणे पोलीस ठाण्याचेे पोलिस निरिक्षक दादासाहेब घुटुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे सर्वच कर्मचारी मेेहनत घेत होते.

Exit mobile version