| पाली/गोमाशी | प्रतिनिधी |
मुख्यमंत्री सडक योजने अंतर्गत गोमाशी फणसवाडी रस्ता करण्यात आला होता. मात्र, गोमाशी ते फणसवाडी हा रस्ता काही ठिकाणी उखडून गेला होता. या मार्गावरून पाली-फणसवाडी ही बससेवा सुरू असून, या बसने विद्यार्थी व ग्रामस्थ प्रवास करीत असतात. परंतु, या रस्तावरील खडी निघाल्यामुळे या मार्गावरून प्रवास करणे नागरिकांच्या जीवाशी बेतत होते. या रस्ताची झालेली दुरवस्था ग्रामस्थांनी शेकाप नेते सुरेश खैरे यांना सांगितली असता त्यांनी ग्रामस्थांसमोर ठेकेदाराला संपर्क साधून ताबडतोब रस्त्याची डागडुजी करण्याचे सांगितले. ठेकेदाराने मंगळवारी (दि.16)ताबडतोब या रस्त्याची डागडुजी करून दिली. या रस्त्याची डागडुजी सुरेश खैरे यांच्या प्रयत्नातून करण्यात आल्याबद्दल ग्रामस्थ आणि तरुण मंडळ फणसवाडी यांनी सुरेश खैरे यांचे विशेष आभार व्यक्त केले.






