रोपवे प्रणालीने मुंबईला एलिफंटाशी जोडणार

पायाभूत सुविधा, विकास प्रकल्पांचाही मंत्र्यांनी घेतला आढावा
। उरण । वार्ताहर ।
केंद्रीय बंदरे, जहाजवाहतूक व जलमार्ग आणि आयुष मंत्री, सर्बानंद सोनवाल यांनी भारतातील सर्वोत्तम कामगिरी करणार्‍या जवाहरलाल नेहरू बंदरास अर्थात जेएनपीए बंदरास भेट दिली. आपल्या भेटी दरम्यान मंत्री महोदयांनी बंदरात नुकत्याच विकसित केलेल्या व डीएफसीशी सुसंगत असलेल्या रेलवे यार्डचे आणि नुकत्याच नूतनीकरण केलेल्याप्रशासकीय इमारतीचे उद्घाटन केले. यावेळी सोनोवाल यांनी जेएनपीए बंदराचा पहिला सस्टेनबिलिटी रिपोर्ट प्रसिद्ध केला व बंदरातील विविध पायाभूत सुविधा आणि विकास प्रकल्पांचा आढावा घेतला. जेएनपीए बंदराचे अध्यक्ष संजय सेठी, भा.प्र.से. व उपाध्यक्ष उन्मेष शरद वाघ, भा.रा.से. यांनी केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल आणि इतर मान्यवरांचे स्वागत केले. सर्बानंद सोनोवाल यांना केंद्रीय औद्योगिक दलाच्या जवानांनी गार्ड ऑफ ऑनर दिला.

या प्रसंगी केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी जेएनपीए बंदराने 33 व्या वर्षात यशस्वीपणे पदार्पण केल्याबद्दल बंदर प्रशासनाचे अभिनंदन केले. यावेळी सोनोवाल म्हणाले केंद्रीय बंदरे, जहाजवाहतुक आणि जलमार्ग मंत्रालयाच्या प्रधानमंत्री गति शक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅन, सागरमाला, मरीटाइम इंडिया विजन (एमआयवी) 2030 सारख्या सर्व उपक्रमांमध्ये जेएनपीए बंदर अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. गेल्या तीन दशकांतील समर्पण आणि योगदान यामुळे जेएनपीए बंदर जागतिक स्तरावर नावरूपास आले आहे. जेएनपीए बंदरातील विविध प्रकल्पांबाबत केंद्रीय मंत्री महोदयांना माहिती देताना बंदराचे अध्यक्ष संजय सेठी, भा.प्र.से. म्हणाले, जेएनपीएमध्ये अनेक पायाभूत सुविधा आणि इतर विकासात्मक प्रकल्प व हरित बंदर उपक्रम सुरू आहेत ज्यामुळे जेएनपी बंदराच्या व्यवसायात वाढ होईल व पर्यायाने देशाच्या आयात-निर्यात व्यापारास चालना मिळेल. आमचे सर्व प्रकल्प मंत्रालयाच्या उपक्रमांशी अनुरूप आहेत ज्यामुळे मल्टीमॉडल कनेक्टिव्हिटी, लॉजिस्टिक खर्चात कपात आणि व्यवसाय करणे सुलभ होते.

जेएनपीए देशाच्या आर्थिक विकासामध्ये महत्वपूर्ण योगदान देण्यासाठी वचनबद्ध आहे. वस्तू आणि सेवांच्या वाहतुकीतील अडथळे दूर करण्यासाठी आणि सर्वोत्तम यंत्रणा प्रदान करून तसेच व्यापार वर्गाच्या पसंतीचे बंदर बनून जागतिक पुरवठा साखळींमध्ये सखोल एकीकरणास समर्थन देण्यासाठी आम्ही सातत्याने काम करत आहोत. मुंबई बंदर प्राधिकरण आता कार्गो बंदरातून पर्यटन बंदरात रूपांतरित करण्याचे ध्येय ठेवत आहे. या संदर्भात, अत्याधुनिक आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनलचे बांधकाम सुरू आहे, आरओ पॅक्स आणि वॉटर टॅक्सी वाहतूक सेवा आधीच कार्यरत आहेत आणि कान्होजी आंग्रे बेट पर्यटन लवकरच लोकांसाठी खुले केले जाईल. याशिवाय, समुद्रावरील जगातील सर्वात लांब रोपवे प्रणाली मुंबईला एलिफंटा लेणीशी जोडेल.

Exit mobile version