भयानक! धावत्या स्कूल व्हॅनने घेतला पेट

। पनवेल । प्रतिनिधी ।
नवीन पनवेल उड्डाण पुलाखालील कांडपिळे सीएनजी पंपाजवळील रस्त्यावर स्कूल व्हॅनने पेट घेतला. गाडी मध्ये सीएनजी गॅस भरून पेट्रोलपंपाच्या बाहेर पडून काही अंतर पुढे गेलेल्या स्कूल व्हॅनने अचानकपणे पेट घेतल्याने परिसरात धावपळ उडाली. सदर घटना आज दुपारी घडली आहे.
नवीन पनवेल उड्डाण पुलाखाली असलेल्या कांडपिळे सीएनजी पंपामध्ये आज दुपारी पाऊणे तीनच्या सुमारास स्कूल व्हॅन क्रमांक एमएच ४६ जे ०३०१ ही गाडी घेऊन चालक गॅस भरण्यासाठी गेला. त्यानंतर सदर गाडी बाहेर काढून चालक थोडा पुढे गेला असता अचानकपणे गाडीने पेट घेतला. यावेळी परिसरातील नागरिकांनी सदर ठिकाणी धाव घेऊन आग्निशमक दलाला घटनास्थळी प्राचारण केले व त्यांनी आग आटोक्यात आणली. आगीमध्ये गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.

Exit mobile version