महामार्गावर देणार आपत्कालीन सेवा
| सुकेळी | वार्ताहर |
शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे यांच्या संकल्पनेतून काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणरायाच्या उत्सवासाठी कोकणात जाणार्या गणेशभक्तांना महामार्गावर कोणताही त्रास होऊ नये यासाठी युवासेना रायगड जिल्ह्यातर्फे सुरक्षासेवा उपक्रम राबविण्यात येणार आहे. ‘भगवं सुरक्षा पथक’ या नावाने हे पथक स्थापन करण्यात आले असून, हे पथक महामार्गावर आपत्कालीन सेवा देण्याकरीता सज्ज झाले आहेत.
यामध्ये पनवेल ते कोलाड तसेच खोपोली ते पाली या मार्गावर कोणालाही वाहतूक कोंडीचा त्रास, वैद्यकीय मदत तसेच रस्त्यावरील अपघातग्रस्त वाहनांना व प्रवाशांना 24 तास तातडीने मदत करण्याचे कार्य भगवं सुरक्षा पथक करणार आहे.
महामार्गावरुन प्रवास करताना कोणाला कोणत्याही आपत्कालीन सेवेकरिता मदत लागल्यास युवासेना भगवं या पथकास संपर्क करण्याचे आवाहन केले आहे. यासाठी हेल्पलाईन क्रमांक राकेश मोकल 7057889990, सुधीर ढाणे 9594959450, सचिन डोबले 7208265551, चेतन मोकल 9270985060, राजेंद्र वाळंज 8149799043 यांच्याशी संपर्क साधावा.