| मुरुड जंजिरा | प्रतिनिधी |
इयत्ता अकरावी एस एस सी जुन्या अभ्यासक्रमाच्या सन 1975 च्या बॅचच्या सुमारे 54 विद्यार्थ्यांनी सुवर्ण महोत्सवी वर्षात शाळेत एकत्र येत स्नेहमेळाव्याने आठवणींचा स्मृतीगंध पुन्हा एकदा दरवळला. अकरावी शालांत परीक्षा जुनी एस एस सी अभ्यासक्रम सन 1975 मुरुडच्या सर एस एस. हायस्कूलमधील बॅचच्या विद्यार्थ्यांनी शाळेचा निरोप घेतला. त्याला चालू वर्षी पन्नास वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने रविवारी शाळेत सुवर्ण महोत्सवी सोहळा आयोजित केला होता. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक तथा सदर बॅचमधील एक विद्यार्थी उदय गद्रे होते.
कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने करण्यात आली. याप्रसंगी शाळेतील दिवंगत शिक्षक, कर्मचारी व सहकारी विद्यार्थ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नितीन पवार यांनी केले उपस्थितांचे स्वागत उदय गद्रे, उल्हास चौलकर, गणेश सुकाळे, विश्वनाथ रणदिवे, अरुणा जोशी, मोहन पाटील, उदय चौलकर, संतोष लखमदे आदींच्या हस्ते करण्यात आले. चंद्रशेखर सतविडकर, दिप्ती विभाकर दांडेकर, पांडुरंग आगरकर, गणेश सुकाळे आदींनी शाळेतील जुन्या आठवणींना यावेळी उजाळा दिला. यावेळी जंजिरा विद्या मंडळाचे संचालक उदय दांडेकर, संचालिका सुशिला म्हात्रे, माजी शिक्षक प्रकाश मसाल, दिलीप दांडेकर, विद्यमान मुख्याध्यापक सरोज राणे, भास्कर मोरे, सचिव उल्हास गुंजाळ, लेखनिक राहुल वर्तक आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उदय खोत यांनी केले.







