शाळांची घंटा वाजली,विद्यांर्थ्यांचे उत्साहात स्वागत

शाळांची दुरवस्था कायम
विद्यार्थ्यांवर टांगती तलवार कायम
अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यामध्ये आज पहिली ते चौथीच्या शाळेची घंटा वाजली आहे. दीड वर्षाने शाळेत विद्यार्थी आल्याने त्याच्या चेहर्‍यावर आनंद पसरला आहे. मात्र जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांची दुरवस्था कायम आहे. निसर्ग चक्रीवादळामुळे तसेच अतिवृष्टी, पूरपरिस्थिती आदींमुळे झालेली शाळांची वाईट परिस्थिती झाली आहे. निधी अभावी ही दुरुस्ती झालेली नाही. तसेच अनेक शाळांमध्ये झाडी झुडपे वाढली असल्याने साप विंचू यांच्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका नाकारता येत नाही. मात्र त्यावर शिक्षण विभागाने काहीही उपाययोजना केल्याचे दिसत नाही.
कोरोनाच्या नियमांचे पालन करून शाळा सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे या छोट्या विद्यार्थ्यांचा किलबिलाट वर्गात सुरू झाला आहे. दीड वर्र्षाीीें मुले शाळेत आल्याने शिक्षकांनी त्याुचे स्वागत केले आहे. जिल्ह्यात पहिली ते चौथीच्या 2108 शाळा असून 1 लाख 82 हजार विद्यार्थी आहेत.
10 हजार 669 शिक्षक असून साडेतीन हजार शिक्षकांचे लसीकरण पूर्ण झाले नाही. त्यामुळे काही शाळा सुरू झाले नाहीत. मात्र, ज्या शाळा सुरू कारण्यात आले आहेत. त्यामध्ये विद्यार्थ्यांची शंभर टक्के उपस्थिती पाहायला मिळत आहे. कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर जिल्ह्यात पाचवी ते बारावी आणि महाविद्यालय सुरू झाली आहे. मात्र, पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांचे शिक्षण ऑनलाईन पद्धतीने सुरू होते.
शासनाने या विद्यार्थ्यांना ही शाळा 1 डिसेंबर पासून कोरोना नियमांचे पालन करून सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार रायगड जिल्ह्यातील 2108 शाळांपैकी काही शाळा आजपासून सुरू करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील साडे दहा हजार पैकी सात हजार शिक्षकांचे 2 डोस लसीचे पूर्ण झाले आहेत. तर उर्वरित साडेतीन हजार शिक्षकांचे 1 डोसही पूर्ण झाले नाहीत. त्यामुळे काही भागातील शाळा सुरू झाले नाहीत.
मात्र, इतर भागातील शाळा सुरू झाल्याने विद्यार्थी, शिक्षकही आनंदित आहेत. शाळेत येणार्‍या विद्यार्थ्यांचे तापमान, ऑक्सिजन तपासणी करून मास्क लावूनच वर्गात प्रवेश दिला जात आहे. दीड वर्षाने पुन्हा शाळेत आल्याने विद्यार्थ्यांमध्ये नवा उत्साह पाहायला मिळत होता. पालकांनीही शाळा सुरू झाल्याने समाधान व्यक्त केले.

Exit mobile version