दुर्गामातेच्या मूर्तीकामांना वेग

अलंकार मढविलेल्या मूर्तींना मागणी; अखेरचा हात फिरविण्यात मग्न
। उरण । वार्ताहर ।
घटस्थापना दोन दिवसांवर आली असताना उरण तालुक्यात कारखान्यांमध्ये देवीच्या मुर्तींवर अखेरचा हात फिरविण्यात मूर्तिकार मग्न झाले आहेत.
उरण शहरातील श्रीकिशोर जगे यांच्या राजपाल नाका येथील सिद्धिविनायक कला केंद्रात दुर्गा मातेच्या मूर्तींना रंग देण्याचे काम सुरु आहे. यावेळी कारागीर रंग कामात मग्न झालेले दिसत आहेत. उरण तालुक्यात चिरनेर, करंजा, मुलेखंड, चाणजे, केगाव बांधीलवाडी, सोनारी, बोकडवीरा आदी ठिकाणी कारखान्यांमध्ये मुर्तींवर शेवटचा हात फिरविला जात आहे.
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर काळजी घेऊन नवरात्रौत्सव साजरा करण्यास राज्य सरकारने संमती दिल्याने मंडळांनी या उत्सवाची लगबग सुरू झाली आहे. मंडळाची मूर्ती प्रसंगी वेशभूषा स्पर्धा, आरोग्य शिबीरे याद्वारे गर्दी खेचण्यासाठी सार्वजनिक मंडळे सरसावली आहेत. जेवढी आकर्षक तेवढेच उत्सवाचे स्वरूप मोठे मानले जाते. कोरोना कमी झाला असला तरी गर्दीने तो वाढू शकतो, हे लक्षात घेऊन मर्यादित उंचीच्या मुर्ती बसवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

मोठ्या मूर्तीवर बंधने असल्याने नवरात्रौत्सवासाठी ज्वेलरीचा साज व कापडी साडी असलेल्या तीन ते चार फुटांच्या देवीच्या मूर्तीना सध्या विशेष मागणी आहे.
-राहुल जितेकर, कुंभारआळी, पेण

Exit mobile version