नवजात अर्भकाच्या पालकांचा शोध सुरु

। पनवेल । वार्ताहर ।
एकदिवसीय नवजात स्त्री जातीच्या अर्भकाच्या पालकांचा शोध पनवेल शहर पोलीस करीत आहेत. तालुक्यातील नांदगाव येथील एकविरा मंदिराच्या शेजारी चाळीच्या पाठीमागील बाजूस या अर्भकास कोणीतरी सोडून दिले आहे. त्यांच्या विरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबत कोणालाही माहिती असल्यास पनवेल शहर पोलीस ठाणे दूरध्वनी क्रमांक 27452333 किंवा सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत शेडगे यांच्याशी संपर्क साधावा.

Exit mobile version