| नेरळ | वार्ताहर |
कर्जत तालुक्यातील उकरुळ येथील तिघेजण गणेश विसर्जन करताना उल्हास नदीत वाहून गेले होते. त्यातील दोघांचे मृतदेह शोधण्यात यश आले असून तिसरा मृतदेह अद्याप सापडला नाही. दरम्यान, प्रशासनाने बोटींच्या माध्यमातून उल्हास नदी पालथी घालण्याचा प्रयत्न केला. शनिवारी दिवसभर चेतन सोनावणे यांचा मृतदेह शोधण्याचे काम सुरूच होते.प्रशासनाने उल्हास नदीत वाहून गेलेल्यांचे मृतदेह बाहेर काढण्यासाठी खोपोली येथील बचाव पथक तसेच कोलाड येथील बोटी मागवून 29 सप्टेंबर आणि 30 सप्टेंबर रोजी दिवसभर शोध मोहीम घेतली. मात्र सतत सुरू असलेल्या पावसामुळे उल्हास नदीचे पाणी गढूळ असल्याने शोध पथकाच्या हाती चेतन सोनवणे यांचा मृतदेह लागला नाही.