| रायगड | वार्ताहर |
विशिष्ट चवीमुळे जांभळांच्या शिरपेचात भौगोलिक मानंकनाचा तुरा रोवला गेला. पण, यंदा हवामान बदलाचा मोठा फटका बसला आहे. तब्बल एक महिना उशिराने जांभळे बाजारात दाखल झाली आहेत.
यंदा जांभळांना काहीसा उशिराने मोहोर आला. तयार झालेली आणि काही दिवसांत काढणीला येणार्या जांभळांचे मे महिन्यांच्या सुरुवातीला झालेल्या गारपिटीत मोठे नुकसान झाले. पक्की झालेली आणि पक्की होण्याच्या अवस्थेतील जांभळांचे नुकसान झाले. दर्जेदार जांभळं गारपिटीमुळे मातीमोल झाली. आता दुसर्या टप्प्यात मोहोर आलेल्या जांभळांची काढणी सुरू झाली आहे. दरवर्षी प्रामुख्याने 20 एप्रिलच्या दरम्यान जांभळांची काढणी सुरू होते. यंदा 25 मे नंतर काढणी सुरू झाली आहे. शिवाय जोमाने आलेल्या पहिल्या बहारातील फळे वाया गेल्यामुळे उत्पादनात पन्नास टक्क्यांपर्यंत घट झाली आहे. यंदा शेतकर्यांना मध्यम आकाराच्या जांभळांना प्रति किलो 400 आणि मोठ्या आकाराच्या जांभळांना प्रति किलो 600 रुपये मिळत आहे. आता नुकतीच काढणी सुरू झाली आहे. मोठ्या झाडांवर रोज जेमतेम दोन-तीन किलो जांभळांची काढणी होत आहे.
जांभळांचा हंगाम लांबला
