| मुंबई | वृत्तसंस्था |
लोकसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीने त्यांची दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये 11 जणांचा समावेश आहे. वंचित बहुजन आघाडीने आधीच आठ उमेदवारांची घोषणा केली होती, त्यामुळे आता वंचितचे एकूण 19 उमेदवार झाले आहेत. वंचित बहुजन आघाडीने आणखी उमेदवार घोषित केल्यामुळे आता प्रकाश आंबेडकरांचा पक्ष महाविकासआघाडीत सहभागी होणार का? याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. वंचित बहुजन आघाडीने जाहीर केलेल्या दुसऱ्या यादीत सोलापूर, माढा, हिंगोली, मुंबई उत्तर मध्य यासह 11 लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे.
वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार हिंगोली- डॉ. बी.डी. चव्हाण, लातूर- नरसिंगराव उदगीरकर, सोलापूर- राहुल गायकवाड, माढा- रमेश बारसकर, सातारा- मारुती जानकरधुळे- अब्दुर रहमान, हातकणंगले- दादागौडा पाटील, रावेर- संजय पंडीत ब्राह्मणे, जालना- प्रभाकर बकले, मुंबई उत्तर मध्य- अबुल हसन खान, रत्नागिरी-सिंधुदुर्ग- काका जोशीयाआधीही वंचित बहुजन आघाडीने 8 उमेदवारांची यादी जाहीर केली होती. यात अकोल्यातून प्रकाश आंबेडकरांना उमेदवारी दिली गेली होती.







