गौवळावाडीतील घरांच्या ओटीमागे रहस्य…जाणून घ्या काय आहे सत्य!

। पेण । संतोष पाटील ।
शहरांशी तुलना करायची झाली तर खेड्यामधल्या त्या कौलारू घरात काहीच खास नसते. शहरातील उंच इमारतींचा खूप डौल असतो. चकचकाट असतो, भरपूर उजेड असतो, योजना असतात, अस्वच्छता नसते, पण तरीही माणसाला ते गावाकडचे घर कौलारू का आठवते? त्या कौलारू घरात असे काय असते, की प्रत्येकच सूज्ञ व्यक्तीच्या मनाच्या कोपर्‍यात ते घर ङ्गघर करूनफ असते. का? पेण तालुक्यातील पाबळ खोर्‍यातील शहरापासून 24 किलोमीटर अंतरावर पाबळ ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात गौवाळावाडी हे गाव येत.

दिवसेंदिवस वाढत असलेल्या ओद्योगिकरणामुळे सिमेंटच्या जंगलांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. त्यामुळे घरांची रचना देखील दाटीवाटीची, रेती सिमेंटचे लेप चाढवललीे व बंदिस्त भिंती, चकाचका मार्बल स्टाईल्स लावलेले आपल्याला दिसतील; परंतु डोंगर काठाडी रानात राहणारा अदिवासी समाज आपल्या विशिष्ट घरांच्या रचनांमुळे नेहमीच चर्चेत राहीला आहे.

बर्‍याच ठिकाणी आदिवासी समाज्याच्या बाबूंच्या घरांचे रुपडं मात्र गेल्या काही वर्षात पालटून गेले आहे. असं असताना देखील काही अदिवासी समाज आपल्या घरांची रचना विशिष्ट प्रकारे करीत असल्याचे आपण पाहू शकतो. गौवळावाडी या गावामध्ये ठाकूर समाजाची लोकवस्ती असून शहरापासून 24 किलोमीटर अंतरावर डोंगराळ भागात हे गाव आहे. या गावामध्ये आपल्याला कुडांची, विटाची घरे पहायला मिळतील. या व्यतिरिक्त जांभ्या खडकांची घरं पहायला मिळतात. परंतु या घरांमध्ये एक गोष्ट एक सारखी आहे ती म्हणजे प्रत्येक घराला ओटी ही आहेच. गाव फिरतांना एक गोष्ट अशी ही दिसली की, प्रत्येक घराला ओटी ही आहेच आणि ओटीवर बसण्याची सुविधा देखील. तसेच जे कारविंची घर आहेत त्या ठिकाणी शेणाने सारवण केलेली ओटी आढळते, तर विटांची व जांभ्या खडकांच्या घरांना ओटीवर लादी ,मार्बल स्टाईल पहायला मिळते. आणखी एक बाब अर्वजून आढळून आली, ती म्हणजे या ओट्यांवर सागाच्या लाकडाचे हँगर अटकवलेले पहायला मिळतात.

या ओट्यांमागील रहस्य काय हे जाणून घेण्यासाठी तेथील रहिवासी राजू बांगारे यांना विचारणा केली असता, त्यांनी सांगितलेली माहिती ही आर्श्‍चयकारक तर होतीच, त्यापेक्षा आरोग्याच्या दृष्टीने किती महत्वाची आहे. ही बाब लक्षात आली. ओटी म्हणजे थोडक्यात पाहूणचाराची जागा. या ठिकाणी येणारे, जाणारे उठ-बस करतात. त्यांचा पाहूणचार ओटीवरच होतो. त्यांना थेट घरामध्ये घेतले जात नाही. आज कोरोनाच्या काळात बाहेरुन येणार्‍या माणसाला घरात घेणे किती धोक्याचे आहे, हे लक्षात येते. मात्र ओटीमुळे बाहेरुन येणार्‍या माणसाला बसायला जागा तर मिळतेच आणि त्यांचा पाहूणचार ही होतो. तसेच माणूस घरामध्ये प्रवेश करु शकत नाही. तसेच डोंगर, वाडया-वस्त्यांनवर बर्‍याच वेळेला विजेचा लंपडाव चालतो. त्यावेळी घरातील मंडळी ओटयांवर येऊन आरामात वार्‍याच्या झुळकीवर विश्रांती घेऊ शकतात. ओट्यांचे एक ना अनेक फायदे असल्याचं नागरिकांशी बोलतांना समजलं.

पूर्ण गावात एकही घर असे नाही की, त्याला ओटी नाही. प्रत्येक घराला ओटी ही आहेच. विशिष्ट रचनेमुळेच या गावात नक्कीच वेगळेपण पहायला मिळते. हे वेगळेपण ग्रामस्थांनी व्यवस्थितरित्या जपून ठेवले आहे. आज सिमेंटच्या जंगलात क्वचीतच गाव अशी पहायला मिळतील, ज्यामध्ये आधुनिकपणा आला; मात्र घराची विशिष्ट रचना बदलली नाही. म्हणूनच या गावामध्ये कुंडांपासुन ते जांभ्या खडकांची घरे ही पहायला मिळतील.

Exit mobile version