| कर्जत | प्रतिनिधी |
कर्जत नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक 2 डिसेंबर रोजी संपन्न झाली होती. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार तिचा निकाल 21 डिसेंबर रोजी जाहीर झाला. यामध्ये चारही उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. 21 जागांसाठी त्यामध्ये परिवर्तन विकास आघाडीने 21 महायुतीने 21 असे 42 उमेदवार उभे केले होते. तसेच, चार अपक्ष उमेदवारांचा समावेश होता. त्यामुळे नगराध्यक्षापदाचे 2 असे एकूण 48 जन निवडणूक रिंगणात होते. प्रभाग क्रमांक- ब मधून जयदीप कृष्णा शिंदे हे उभे होते त्यांना 162 मते मिळाली प्रभाग क्रमांक 5 ब मधून उमेश अर्जुन शेलार हे उभे होते त्यांना 9 मते मिळाली प्रभाग क्रमांक 9 अ मधून राजेश पिराजी साळुंके हे उभे होते त्यांना 20 मते मिळाली तर प्रभाग क्रमांक 10 ब मधून नितेश राजेंद्र बाचल यांना 246 मते मिळाली या चारी उमेदवारांची महाराष्ट्र निवडणूक नियमानुसार उमेदवार निवडून न आल्यास त्यास मिळालेल्या वैध मतांची संख्या सर्व उमेदवारांना मिळालेल्या वैध मतांच्या एकूण संख्येच्या एक अष्टमांशपेक्षा अधिक होत नसेल तर त्यांची अनामत रक्कम नगर परिषदेकडे जमा राहते यानुसार या चारही उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे.
चार उमेदवारांची अनामत रक्कम जप्त
