कोर्लई येथील चौघांना अटक
| रेवदंडा | वार्ताहर |
कोर्लई येथे रात्रीच्या सुमारास उधारीने सामानाची मागणी केली असता, सामान देण्यास नकार दिल्याचा राग मनात धरून चौघांनी दुकानात शिरून दुकानदारास मारहाण केली व त्याच्या पत्नीस शिवीगाळ केल्याची घटना घडली आहे.
मुरूड तालुक्यातील कोर्लई येथे दि. 15 एप्रिल रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास दुकानदार लियाकत फिरफीरे (40) यांच्याकडे कोर्लई गावातील फारूख बेबल (20), विजेंद्र चोरडेकर (24), आर्यन कोटकर (22) व आक्षी साखर येथील यश घाडगे (24) यांनी उधारीने सामानाची मागणी केली. दुकानदार लियाकर फिरफिरे यांनी त्यांना उधारी देण्यास नकार दिला. या बाबीचा राग मनात धरून दुकानात शिरून लियाकत फिरफिरे यांना चौघांनी लाथाबुक्काने मारहाण केली व त्याचे पत्नीस शिवीगाळ केली. या मारहाणीत दुकानाच्या काचेवर दगड फेकून काच फोडली. तसेच, यावेळी तेथे असलेले सलिम सुदेकर यांनादेखील मारहाण केली. यावेळ फारूख बेबल यांनी सलिम कुदेकर यांच्या हाताचे बोटाला चावा घेत दुखापत केली.
याबाबत दुकानदार लियाकर फिरफिरे यांनी रेवदंडा पोलीस ठाणे येथे दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामधील दि. 19 एप्रिल रोजी फारूख बेबल, विजेंद्र चोरडेकर व आर्यन कोटकर यांना अटक करण्यात आली असून, अधिक तपास रेवदंडा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शिवकुमार नंदगावे हे करत आहेत.