रायगडचे किनारे पुन्हा बहरले

निर्बंध उठल्याने पर्यटकांची मांदियाळी
अलिबाग | विशेष प्रतिनिधी |


कोरोनाची रुग्णसंख्या घटताच प्रशासनाने पर्यटनस्थळे पुन्हा खुली केल्याने पर्यटकांची पाऊले पुन्हा रायगडकडे पडू लागली असून,गेल्या दोन दिवसांपासून रायगडचे सर्वच किनार्‍यांना पर्यटकांची भरती आल्याचे चित्र दिसत आहे.
गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची रुग्णसंख्या वाढताच निर्बंध घातले जात आहेत तर प्रादुर्भाव कमी होताच हे निर्बंध शिथिल केले जात आहेत.त्यानुसार यावेळीही प्रशासनाने पर्यटन स्थळे खुली केल्याने पर्यटकांचा आनंद द्विगुणीत झाला असून,विकेंडसाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक रायगडात दाखल झालेले आहेत.यााचा फायदा पर्यटनावर अवलंबून असलेल्या सर्वच घटकांना होत असून,जिल्ह्यातील सर्व समुद्रकिनारे,तेथील हॉटेल्स,लॉजेस,वाड्या,फार्महाऊसेस हाऊसफुल्ल झालेली आहेत.पर्यटकांच्या आगमनाने किनारेही आता फुलून गेलेेले आहेत.
दरम्यान,पर्यटकांची संख्या वाढल्याने वाहतूक व्यवस्थेवर विपरित परिणाम झालेला आहे.ठिकठिकाणी पर्यटकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला आहे.

Exit mobile version