अघोषित शिक्षकांचे ठिय्या आंदोलन

| पाली/गोमाशी । वार्ताहर ।
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या मुंबईतील बंगल्यासमोर काँग्रेस नेते प्रकाश आण्णा सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी ता. 21 मार्च रोजी अघोषित शिक्षक महासंघाचे तसेच अघोषित शिक्षकांचे ठिय्या आंदोलन करण्यात आले. गेल्या 20 वर्षांपासून शासनाच्या दुर्लक्षतेमुळे प्रलंबित असलेला अघोषित शिक्षकांचा प्रश्‍न त्वरित सुटावा यासाठी महाराष्ट्रातील सर्व अघोषित शिक्षक सातत्याने आंदोलनाच्या मार्गातून प्रयत्न करत आहे. सर्व अघोषित शिक्षकांना अनुदानासह घोषित करावे व अनुदानाचा शासन निर्णय निर्गमित करावा या एकमेव मागणीसाठी महाराष्ट्रातील सर्व अघोषित शिक्षक बांधव काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या बंगल्यासमोर शेकडो शिक्षक काँग्रेस पक्षाचे शिक्षक नेते प्रा.प्रकाश सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषणास बसले आहेत. या उपोषणात प्रा. प्रकाश अण्णा सोनावणे, प्रा. योगेश नंदन, प्रा. गावडे, प्रा. स्वामी, प्रा. डोंगरे, प्रा. बाबान येवले, प्रा.रहाटे काका, प्रा. रंगारी, प्रा.संजना भोईर मॅडम प्रा. गयाली मॅडम, प्रा. व्यापारी मॅडम, प्रा. व्यापारी, प्रा. जामनिक , प्रा. तुकाराम देसले, प्रा. सोमनाथ पतंगे, प्रा. बेलूरे . प्रा.भंडे, प्रा. पाटील सर, प्रा. गायकवाड हे शिक्षक आंदोलन कर्ते सहभागी झाले आहेत.

Exit mobile version