ऑक्सिजन पार्कमधील दगड झाले बोलके

| उरण । वार्ताहर ।

उजाड माळरानाला एक सुंदर स्वरूप देण्याचे काम उरण परिसरातील सारडे या गावातील सारडे विकास मंचच्या माध्यमातून करण्यात आले आहे. या उजाड माळरानातील दगडांवर विविध चित्रे काढून हा परिसर अधिक सुशोभित करण्यात आला आहे.

सारडे विकास मंचच्या संकल्पनेतून तयार झालेल्या कोमनादेवी ऑक्सिजन पार्क सारडे उरणमध्ये मोस्ट कार्ट कंपनीचे मालक सतीश गावंड यांच्या सहकार्याने कोमनादेवी ऑक्सिजन पार्क सारडे येथे निर्जीव दगडांवर अनेक प्राणी, पक्षी विविध प्रकारचे निसर्ग संवर्धनाचे संदेश रेखाटून या दगडांना सजीव करण्याचा प्रयत्न केला आहे.

राष्ट्रपती पुरस्कार विजेते रवींद्र साटम आणि त्यांचे सहकारी स्वाती, गणेश, ओमकार यांच्या कलाकारीने हे दगड जिवंत झाले आहेत. अनेक निसर्ग प्रेमी आणि पक्षी, प्राणी प्रेमी यांच्यात आनंदाचे वातावरण पसरले आहे. लहान मुले ते वृद्धदेखील पहाण्यासाठी गर्दी करू लागले आहेत. अनेक शाळांच्या शैक्षणिक सहली या ऑक्सिजन पार्कमध्ये होत आहेत. भविष्यात कोमनादेवी ऑक्सिजन पार्क हे एक सुदंर पर्यटन स्थळ व्हावे यासाठी हा प्रयत्न सारडे विकास मंचच्या सदस्यांमार्फत केला जात आहे. सारडे विकास मंचचे अध्यक्ष नागेंद्र म्हात्रे यांच्या संकल्पनेतून हे उद्यान साकार झाले आहे.

Exit mobile version