| अलिबाग | प्रतिनिधी |
पीएनपी प्रभाविष्कार अंतर्गत अलिबाग-चेंढरे येथील पीएनपी नाट्यगृहात नागांव येथील पीएनपी सायरस पूनावाला शाळेचा विविध गुणदर्शन सोहळा पार पडला. यावेळी विद्यार्थ्यांनी छत्रपती संभाजीराजांच्या पराक्रमाचा इतिहास व महाराष्ट्राची लोकधारा नृत्याविष्कारातून सादरीकरण केले. तसेच, उपस्थित मान्यवरांनी देखील गाण्याच्या माध्यमातून संभाजी राजांना आदरांजली वाहिली.
या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख मान्यवर म्हणून अलिबाग मधील प्रसिद्ध गायिका जुईली म्हात्रे व प्रसिद्ध गायक प्रशांत म्हात्रे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी शेकापचे ज्येष्ठ नेते द्वारकानाथ नाईक, निलेश खोत, मुख्याध्यापिका गितीका भूचर, ॲकॅडमिक डायरेक्टर राजश्री पाटील, लेखापाल मनिषा रेलकर, अंकित भानुशाली, जनसंपर्क अधिकारी अमोल नाईक आदींसह इतर मान्यवर, शाळेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध गाण्यांवर देखील नृत्याविष्काराचे सादरीकरण केले.
