| पाताळगंगा | प्रतिनिधी |
रायगड भाताचे कोठारे म्हणून प्रचलित असून सध्या शेतीला औद्योगिकीकरणाचे ग्रहण लागले असल्यामुळे भात शेती कमी होत चालली आहे. शेती अल्प असल्यामुळे पारंपरिक पध्दतीने शेती न करता तांत्रिक पध्दतीने शेती केली जाते. परिणामी शेतकऱ्यांकडील गुरे कमी होत चालल्यामुळे पेंढा साठविण्यासाठी लाकडी माच लुप्त होत चालला आहे.
पुर्वी शेती ही मोठ्या प्रमाणात असल्यामुळे शेतकऱ्याजवळ गुरे ही खूप होती. मात्र गेल्या काही वर्षात औद्योगिकीकरण तसेच शेतीचे विभाजन झाल्यामुळे शेती ही तुकड्यामध्ये विभागली गेली. त्यातच मुंबई सारख्या धनीकांनी आपली जमीन घेवून त्या ठिकाणी बंगले बांधले गेले आहेत. परिणामी लागवडीचे क्षेत्र कमी होत चालले आहे. यामुळे पेंढा जमा साठविण्याचे प्रकार बंद झाले. मात्र आजही ग्रामीण भागात लाकडी माच रचून पेंढा साठविण्याची पद्धत तुरळक ठिकाणी अनुभवास मिळत आहे.
पेंढा ठेवण्याचा माच होतोय लुप्त
