मागण्या मान्य होईपर्यंत संप सुरुच राहणार -टिकैत

नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
केंद्र सरकारने तीन कृषी कायदे मागे घेतले असले तरी अजुनही काही मागण्या प्रलंबित आहेत.त्या जोपर्यंत सोडविल्या जात नाहीत तोपर्यंत आमचे आंदोलन सुरुच राहणार असल्याचे शेतकरी आंदोलन नेते राकेश टिकैत यांनी जाहीर केलेले आहे.
राजधानीच्या सिंघू बॉर्डरवर शेतकरी संघटनांची बैठक आहे. त्यामुळे पंतप्रधानांच्या आवाहनानंतर शेतकरी आंदोलन मागे घेणार का? अशी चर्चा होती. पण, आता शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी शेतकरी आंदोलनाबाबतची भूमिका स्पष्ट केली आहे. आजची बैठक ही फक्त शेतकरी संघटनांमध्ये आहे. येत्या 4 डिसेंबरला संयुक्त किसान मोर्चाची बैठक होणार आहे. मात्र, केंद्र सरकारने अद्यापही आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत. सरकार मागण्या पूर्ण करत नाही तोपर्यंत शेतकरी आंदोलनावर ठाम राहतील , असं टिकैत म्हणाले.
सूत्रांच्या माहितीनुसार, 32 पैकी सुमारे 20-22 संघटनांचं आंदोलन मागे घेण्यावर एकमत झालं. तर सुमारे 8-10 संघटना उर्वरित मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरुच ठेवण्याचा विचार करत आहेत. दरम्यान, पंजाबचे जोगिंदर सिंह उग्राहान आणि हरियाणाचे सरवन सिंह पंढेर गुरनाम चधुनी यांसारखे मोठे शेतकरी नेते संप सुरु ठेवण्याच्या बाजूने आहेत. सिंघू आणि टिकरी सीमेवर त्यांच्या संघटनेचे शेतकरी मोठ्या संख्येने ठाण मांडून आहेत. आता राकेश टिकैत यांनी देखील शेतकरी आंदोलन सुरूच राहणार असं सांगितलं आहे.

Exit mobile version