बियाणांंच्या संवर्धनासाठी तरूणांची धडपड

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
बाजारात गेल्यावर हिरव्यागर दिसणार्‍या भाज्या आपले लक्ष वेधून घेतात. मात्र ह्या सर्व भाज्या संकरित बियाणांचा असतात. संकरीत बियाणांची शेती केल्यामुळे पारंपारिक बियाण लुप्त होत चालली आहेत. या पारंपारिक बियाणांचे संवर्धन करण्याचे तसेच शेतीतील जैवविविधतेचे संवर्धन करण्याचे प्रयत्न सिंधुदुर्ग जिल्ह्याातील डिगस ग्रामपंचयतीमधील तरूण करत आहेत. 11 तरूणांनी एकत्र येऊन डिगस-चोरगेवाडी येथे स्थानिक बियाण बँक स्थापन केली आहे. 11 पैकी 9 जण मुबईत शिकलेले, मुबईतच नोकरी करत होते. हे सर्व तरूण मुबईतील नोकरी सोडून आपल्या मुळगावी आलेत आणि ही बियाणे बँक चालवत आहेत. त्यांच्या प्रयत्नांना आता शेतकर्‍याकडून देखील चागला प्रतिसाद मिळत आहे. हे तरूण इतरांना शेतीकडे वळवण्याचा प्रयत्न करत आहेत.

संकरीत बियाण वापरण्यापेक्षा त्या भागातील वातावरणात टिकू शकतील, वाढू शकतील अशा वाणांची शेती केली पाहिजे. परंतु या स्थानिक जाती आता नष्ठ होऊ लागल्या आहेत. त्यांचे संवर्धन करणे आवश्यक आहे. या स्थानिक पारंपरिक बायाणांचे संवर्धन व जतन करण्यासाठी हे ध्येयवेडे तरूण शहराकडून गावाकडे आले आहेत. बियाणे हा शेतीचा आत्मा आणि सर्वात महत्वाची निविष्ठा असून गेल्या हजरो पिढ्यांपासून शेतकर्यांनी विविध पिकांच्या अनेक जाती निवडल्या, सुधारणा केल्या आणि त्याचा अन्न आणि पोषण सुरक्षा, आर्थिक उन्नतीसाठी वापर केला. परंतु सध्या सुरु असलेल्या एकांगी पध्दतीच्या पिक वाण सुधारणा कार्यक्रमामुळे अनेक पिक जातीमधील विविधता अत्यंत दुर्मिळ झाली आहे. आता काही निवड पिक जातींनी हजारो एकर जमीन व्यापून टाकली आहे; त्यामुळे ही जैवविविधता धोक्यात आली आहे. पिकामधील जनुकीय विविधताही पिकवाणविविधता टिकवण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात बेळा किंवा वालयी या जातीच्या भातीचे उत्पादन मोठ्याप्रमाणावर घेतल जात असे. या भाताची पेज चवदार असते. त्यामुळे त्या भाताला मागणी आहे. परंतु हल्ली या भाताचे उत्पादन फार कमी घतले जाते. परंतु शहरांमध्ये पेजेसाठी या भातला भरपूर मागणी आहे. या तरूणांनी येथील शेतकर्यांना सांगितले की तुम्ही या भाताचे उत्पादन घ्या. आम्ही तुम्हाला बियाणं पुरवतो. तुम्हाला तंत्रज्ञान देतो. तुम्ही उत्पादीत केलेला माल विकत घेतो. शेतकर्यांना हे पटल. आता या भगातील शेतकरी वालयी या जातीच्या भाताचे उत्पादन घेऊ लागलेत. त्यांना चांगले उत्पन्न देखील मिळू लागले आहे. या बियाण बँकेत 52 प्रकारच्या स्थानिक जातीच्या भाची वियाण आहेत. 38 प्रकारच्या पालेपभाजी, शेंगभाजी, फळ भाजी, कंदमुळ यांची बियाण आहेत. मुबईत राहून कुणाची नोकरी करायची नाही. आपल्याच गावात प्रयोगशील शेती करायची. या उद्देशाने हे तूरण मुबईतून आपल्या गावी परत आले. आज हे तरूण शेतीतूनच चांगले उत्पन्न मिळवत आहेत. त्यांच्यामुळे तरूण शेतीकडे वळू लागला आहे. स्थानिक बियाणं बँकेचे उपक्रम कोकणात अन्यभागांमध्ये देखील राबविले गेल्यास कोकणातील शेतीतील जैवविविधातेच संवर्धन तर होईलच शिवाय तरूणांना रोजगारही मिळू शकतो

Exit mobile version