वंचित बहुजन आघाडीचा लढा यशाच्या वाटेवर

रिलायन्स नागोठणे प्रकल्पग्रस्त, भूमीपुत्रांच्या पदरात कायमस्वरूपी नोकरी मिळणार

| पाली /बेणसे | वार्ताहर |

आय.पी.सी.एल / रिलायन्स कंपनी नागोठणे प्रकल्पबाधीत कायमस्वरुपी नोकरी पासून वंचित राहिलेल्या प्रकल्पग्रस्त प्राधान्य प्रमाणपञ धारकांची न्याय हक्काची महत्वपूर्ण बैठक जिल्हा कार्यालय रायगड अलिबाग येथे पार पडली. वंचित बहुजन आघाडीचा लढा आता यशाच्या वाटेवर आहे , रिलायन्स नागोठणे प्रकल्पग्रस्त, भूमीपुत्रांच्या पदरात कायमस्वरूपी नोकऱ्या मिळणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. याबाबत सोमवारी रायगड जिल्हाधिकारी डॉ योगेश म्हसे 324 प्रमाणपत्र धारक यांचा अंतिम फैसला देतील असे संकेत मिळत आहेत. त्यामुळे प्रकल्पग्रस्त, भूमिपुत्र यांच्या चेहऱ्यावर हसू उमटले आहे.

पूर्वीची आयपीसीएल व आत्ताच्या रिलायन्स नागोठणे कंपनी परिसरातील प्रमाणपत्र धारक, भूमिपुत्रांना कायमस्वरूपी नोकरीत सामावून घ्यावे या मागणीसाठी मागील 35 ते 40 वर्षांपासून सातत्यपूर्ण लढा सुरू आहे. वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन भूमिपुत्र प्रकल्पग्रस्त सामाजिक संस्था चोळे यांनी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड: प्रकाश (बाळासाहेब )आंबेडकर, भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष ऍड भीमराव आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली व्यापक स्वरूपाचा लढा उभारला आहे. कंपनीत कायमस्वरूपी नोकरी मिळावी या मागणी च्या संदर्भात रायगड जिल्हाधिकारी रायगड यांच्या अनुपस्थितीत, अप्पर जिल्हाधिकारी सुनिल थोरवे आणि डेप्युटी जिल्हाधिकारी पुनर्वसन विभाग भारत वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच प्रशासकीय अधिकारी म्हणून बैठकीस प्रमुख उपस्थिती उपविभागीय अधिकारी रोहा ज्ञानेश्वर खुटवल, तसेच रिलायन्स नागोठणे कंपनी व्यवस्थापन वरिष्ठ अधिकारी आणि प्रकल्पग्रस्त कमिटी पदाधिकारी यांच्यात महत्वपूर्ण आणि निर्णायक सकारात्मक बैठक पार पडली.

या बैठकीस रिलायन्स व्यवस्थापनाचे वरिष्ठ अधिकारी श्रीकांत गोडबोले , रमेश धनावडे, ॲड आनंद देशपांडे आणि वंचित बहूजन आघाडी / माथाडी ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियन प्रणित भूमिपुञ प्रकल्पग्रस्त सामाजिक संस्था चोळे ते नागोठणे यांच्या वतीने बैठकीस वंचित बहूजन आघाडी चे महाराष्ट्र राज्याचे प्रवक्ते प्रियदर्शी तेलंग , वंचित बहूजन माथाडी, ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन चे महाराष्ट्र सरचिटणीस सूरेश गणपत मोहिते ,ॲड संदेश मोरे ( उच्च न्यायालय मुंबई ), वंचित बहूजन आघाडी दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष रविंद्र चव्हाण, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष प्रदिप ओव्हाळ साहेब, महासचिव दक्षिण रायगड सागर भालेराव, प्रियदर्शन तेलंग, वंचित बहूजन माथाडी, ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन रायगड जिल्हा संपर्क प्रमुख कु पुष्पा उर्फ रुपा ताई भोईर, तसेच भूमिपुञ प्रकल्पग्रस्त सामाजिक संस्था चोळे ते नागोठणे अध्यक्ष गंगाराम माया मिणमीने, सचिव राकेश यशवंत जवके, उपाध्यक्ष रोशन रमेश जांबेकर, कार्यवाहक सूरेश महादेव कोकाटे, खजिनदार संजय दयाराम कुथे आणि अन्य सभासद यांच्या प्रमुख उपस्थितीत निर्णायक बैठक घेऊन चर्चा करण्यात आली आहे.

बैठकीच्या चर्चेत दोन्ही पक्षकारांची मत ऐकूण घेतल्या नंतर डेप्युटी जिल्हाधिकारी भारत वाघमारे यांनी 324 प्रमाणपञ धारकांच्या प्रकल्पातील कायमस्वरुपी नोकरी संदर्भात सकारात्मक भूमिका घेऊन, 324 प्रमाणपञ धारकांची अंतिम यादी तपशिल भूमिपुञांच्या प्रतिनीधींच्या उपस्थितीत दोन दिवसात तयार करुन अंतिम यादी फायनल करुन झाल्या नंतर, सोमवारी स्वता जिल्हाधिकारी रायगड अलिबाग यांच्या स्वाक्षरीचे प्रकल्पग्रस्तांना प्रकल्पात कायमस्वरुपी नोकरीत सामावून घेणे कामी आय.पी.सी.एल / रिलायन्स नागोठणे कंपनी व्यवस्थापनास आदेश / निर्देश देण्यात येतील आणि आदेशांचे पालन रिलायन्स व्यवस्थापना कडून झाले नाही. तर प्रशासकीय स्तरावर कंपनी विरोधात योग्य तो महत्वपुर्ण निर्णय घेण्यात येईल अशी स्पष्ट भूमिका डेप्युटी जिल्हाधिकारी पुनर्वसन विभाग भारत वाघमारे यांनी उपस्थितां समोर ठेऊन निर्णायक संयुक्त बैठक संपवली आहे. त्यानंतर प्रकल्पग्रस्थानी घोषणा बाजी करीत लढ्याची विजयाच्या दिशेने होत असलेल्या निर्णयाचे जल्लोषात स्वागत केले.

Exit mobile version