| म्हसळा | प्रतिनिधी |
भारतातील शेतकरी हा भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा मानला जातो. शेतकऱ्यांबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी, दरवर्षी 23 डिसेंबर रोजी राष्ट्रीय शेतकरी दिवस साजरा केला जातो. भारताचे 5 वे पंतप्रधान चौधरी चरणसिंग यांच्या जयंतीनिमित्त देशात 23 डिसेंबर रोजी किसान दिवस साजरा केला जातो. त्या अनुषंगाने म्हसळा तालुक्यातील पीएमश्री शाळा नं 1 येथे राष्ट्रीय शेतकरी दिन साजरा करण्यात आला. यासाठी इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी शेतकरी वेशभूषा धारण करून शाळेतील परसबागेत स्वतः काम करून प्रत्यक्ष अनुभव घेतला. विद्यार्थ्यानी आकर्षक अशी परसबाग फुलवली असून परसबागेचे सर्वत्र कौतुक होत आहे. तसेच या विद्यार्थ्यांनी शेती अवजारांचा उपयोग कसा केला जातो, याची माहिती विद्यार्थ्यांना सांगितली. यावेळी शाळेतील शिक्षक श्रीधर उमदी, इंदिरा चौधरी, जयश्री गायकवाड, दीपक मुंडे यांनी विशेष मेहनत घेतली.






