विद्यार्थ्यांनी बांधला श्रमदानातून बंधारा

डॉ. पतंगराव महाविद्यालयाचे श्रमसंस्कार शिबीर संपन्न

| पेण | वार्ताहर |

पेण येथील डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना विशेष निवासी श्रमसंस्कार शिबिर ग्रुप ग्रामपंचायत तांबटी येथे 19 ते 25 जानेवारी या कालावधीत संपन्न झाले. दरम्यान, विद्यार्थ्यांनी डोणवत येथील बाळगंगा नदीवर श्रमदानातून वनराई बंधारा बांधून पाणी अडविण्याचेे अमूल्य कार्य केले.

दरम्यान, शिबिराच्या उद्घाटनाला राष्ट्रीय सेवा योजना रायगड जिल्हा समन्वयक प्रा. टी.पी. मोकल, तर स्वागताध्यक्ष प्राचार्य डॉ. बाबासाहेब दुधाळे उपस्थित होते. या सात दिवशी शिबिरात डॉ.अमोल नारखेडे यांनी आरोग्य तपासणी करून आरोग्यविषयक मार्गदर्शन केले. ग्रुप ग्रामपंचायतीमधील सर्व गावांमध्ये विद्यार्थ्यांनी स्वच्छता मोहीम राबवली. तसेच सामाजिक प्रबोधन करणारी रॅलीकडून लोकजागृतीचे कार्य केले. तसेच डोणवत येथील बाळगंगा नदीवर श्रमदानातून बंधारा बांधला.

समारोपाच्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून प्रशांत कदम तर अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ. बाबासाहेब दुधाळे उपस्थित होते. तांबाटी गावचे सरपंच अनिल जाधव, उपसरपंच जगदीश आवासकर, राकेश लाड, सारिका लाड यांनी मोलाचे सहकार्य केले. राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे प्रमुख कार्यक्रमाधिकारी डॉ. आलम शेख, प्रा. डॉ. बाळासाहेब सरगर, प्रा. अनिल वळवी, प्रा. समीना नायकवडी, प्रा. डॉ. विनायक पवार यांच्या देखरेखीखाली हे शिबिर संपन्न झाले. या कार्यक्रमाला सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

Exit mobile version