| आगरदांडा | प्रतिनिधी |
मुरूड-जंजिरा नगरपालिकेच्या सभागृहात पिठासीन अधिकारी तथा मुख्याधिकारी सचिन बच्छाव यांच्या अध्यक्षतेखाली विषय समित्यांच्या निवडीसाठी विशेष सभा पार पडली. सभेच्या सुरुवातीला सदस्यांचे स्वागत करून सभेच्या नोटीसचे वाचन करण्यात आले. यावेळी विषय समित्यांची संख्या किती असावी, यावर चर्चा झाली.
शिंदे शिवसेना पक्षाचे गटनेते पांडुरंग आरेकर यांनी अध्यक्षांसह सहा समित्या असाव्यात, अशी मागणी केली. तर सत्ताधारी अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक तमीम ढाकम यांनी चार समित्यांचा प्रस्ताव मांडला. संख्याबळ लक्षात घेता निवडणूक न घेता तडजोडीने अध्यक्षांसह पाच विषय समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर पाचही विषय समित्यांवरील सदस्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या सभेला नगरपरिषद प्रशासकीय अधिकारी नंदकुमार आंबेतकर, प्रकाश आरेकर, सुदेश माळी, सतीश जंजिरकर, निलेश शेंडगे, शिंदे, पांढरे मॅडम यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. महिला व बालकल्याण समितीच्या उपसभापती निवडीनंतर नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले. स्थायी समिती अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्षा आराधना मंगेश दांडेकर यांची स्थायी समितीच्या अध्यक्षा म्हणून बिनविरोध निवड झाली.
आरोग्य व शिक्षण समिती : सभापती : विरेंद्र दत्तात्रेय भगत, सदस्य : अंकिता दिपेश गुरव, ॲड. रुपेश शंकर पाटील, आदेश हरिश्चंद्र दांडेकर, तमीम ढाकम.
बांधकाम व दिवाबत्ती समिती : सभापती : यास्मिन जाहिद कादिरी, सदस्य : ॲड. रुपेश शंकर पाटील, नितिन नामदेव, आंबुर्ले, आदेश हरिश्चंद्र दांडेकर, मनोज हरिश्चंद्र भगत.
पाणीपुरवठा व जलनिस्सारण समिती : सभापती : पांडुरंग कृष्णा आरेकर, सदस्य : मनीष मोहन विरकुड, विजय शंकर पाटील, रुपेश रमेश पाटील, प्रीती प्रविण चौलकर.
नियोजन व पर्यटन विकास समिती : सभापती : रुपेश रविंद्र रणदिवे, सदस्य : वैदेही प्रकाश आरेकर, श्रीकांत नारायण खोत, श्रद्धा चंद्रकांत अपराध, प्रमिला सुभाष माळी.
महिला व बालकल्याण समिती : सभापती : नगमाना इम्तियाज खानजादे, उपसभापती : सुगंधा पांडुरंग मकु, सदस्य : अंकिता दिपेश गुरव, देवयानी देवेंद्र गुरव, प्रांजली चेतन मकु.
