गरिबीवर मात करत उरणच्या सागरचे यश

परदेशात मिळवली डॉक्टरेट

| उरण | वार्ताहर |

शिकायची इच्छा असेल तर आर्थिक कमतरता किंवा गरिबी अडथळा होऊ शकत नाही, मदतीसाठी समाजही मागे नसतो हे उरणच्या डॉ. सागर अडतराव याच्या उदाहरणाने सिद्ध केले आहे. वडील रिक्षाचालक तर आई गजरे विक्री करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारी, त्यामुळे अतिशय गरीब कुटुंबात जन्मलेल्या सागर अडतराव या उरणच्या बोरी येथे राहणाऱ्या बुद्धिमान मुलाने नेदरलँडमधून डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी ही पदवी मिळविली आहे.

सागर दहावी आणि बारावी मध्ये तालुक्यात प्रथम आला होता. मेकॅनिकल इंजिनिअर पूर्ण करताना मुंबई विद्यापीठात प्रथम येण्याचा बहुमान त्याने मिळविला होता. पुढे च. ए. चेन्नई येथे पूर्ण करून तो पीएचडी पूर्ण करण्यासाठी नेदरलँड्स या देशात गेला. आज त्याने ती पदवी यशस्वीरित्या पूर्ण करून परदेशातून पीएचडी पूर्ण करणारा तो उरण तालुक्यातील पहिला मुलगा ठरला आहे. या खडतर प्रवासात माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी वेळोवेळी आर्थिक मदतीचा हातभार दिला. उरण सामाजिक संस्थेचे सरचिटणीस संतोष पवार सर यांनी वेळोवेळी मार्गदर्शन आणि आर्थिक मदतदेखील केली. तसेच उरणमधील अनेकांनी सागरला मदतीचा हाभार दिला. सागरने याचे चीच करून डॉक्टरेट पदवी मिळविण्यात यशस्वी झाला. सागरच्या या यशाबद्दल त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. यामुळे सागरने उरणचे नाव ही रोशन केले आहे.

वडिलांनी रिक्षा चालवून तर आईने गजरे विकुन मिळणाऱ्या तुटपुंज्या कमाईवर सागरला शिकविले. जन्मताच हुशार असलेल्या सागरने आपल्या गरिबीवर मात करून सर्वांच्या सहकार्याने डॉक्टरेट पदवी मिळविण्यात यशस्वी झाला आहे. याचा आदर्श इतर मुलांनी नक्कीच घ्यावा.

Exit mobile version