अलिबागच्या विराज म्हात्रेचे यश

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
अलिबागचा सुपुत्र विराज अजय म्हात्रे याने नुकतीच मास्टर्स इन आर्किटेक्चर ही पदवी ऑस्ट्रेलिया, ब्रिस्बेन येथील युनिव्हर्सिटी ऑफ क्विन्सलँड विद्यापीठातून विशेष प्राविण्यासह प्राप्त केली.
क्विन्सलँड विद्यापीठ हे जागतिक क्रमवारीत 48 व्या क्रमांकावर आहे. विविध देशांमधून उच्चशिक्षणासाठी या विद्यापीठात विद्यार्थी प्रवेश घेतात. विराजने 2019 जुलैमध्ये ह्या विद्यापीठात प्रवेश घेतला आणि जून 2021 या निर्धारित वेळेत हा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. आपला अभ्यासक्रम पूर्ण करताना, शैक्षणिक खर्च भागविण्यासाठी पार्ट टाईम जॉब करण्याच्या सुविधेचा फायदा विराजने घेतला आहे. विराज आपल्या संपूर्ण यशाचे श्रेय युनिव्हर्सिटी ऑफ क्विन्सलँडच्या तज्ज्ञ शिक्षकवर्ग आणि आपल्या आई-वडिलांना दिले आहे. विराजचे वडिल अजय मधुसूदन म्हात्रे आर.सी.एफ.थळ प्रकल्पात वरिष्ठ तंत्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत, तसेच ते श्री अंबिका योग कुटीर या सेवाभावी संस्थेच्या अलिबाग शाखेत योगशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. तसेच विराजची आई जयश्री म्हात्रे गृहिणी आहे. विराजने आपले प्राथमिक, माध्यमिक शिक्षण सेंट मेरी स्कूल, उच्च माध्यमिक शिक्षण आर.सी.एफ. स्कूल येथे पूर्ण केले. तर बॅचलर ऑफ आर्किटेक्चर पदवी पिल्लई कॉलेज रसायनी पनवेल येथून घेतली आहे. विराजच्या या उत्तुंग यशाबद्दल समाजातील विविध स्तरातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Exit mobile version