मॅकमोहन हुले यांची यशस्वी चढाई ; हिमालयातील 15700 फूट माचाधारेवर सर

। सुधागड-पाली । वार्ताहर ।
रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील पोटलज खुर्द येथील प्रसिद्ध गिर्यारोहक मॅकमोहन हुले यांनी नुकतेच हिमालयातील ‘15700 फूट’ माचाधारेवर यशस्वी चढाई करून रायगड जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. आणखी नव्या रेकॉर्डसाठी ते हिमालयातील सर्व शिखर सर करणार आहेत.
नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ मौंटेनीरिंग, उत्तराखंड, उत्तरकाशी, बेसिक मौंटेनीरिंग कोर्से, बॅच नंबर 271, रोक क्राफ्ट, आईस क्राफ्ट, स्नो क्राफ्ट प्रशिक्षण दौर्‍याच्या शेवटच्या दिवशी सकाळी माचाधार क्लायंबिंग करण्यात आली. हुले यांनी जिथे बेस कॅम्प केला होता, त्या हिमनदीचे नाव ‘डोक्राणी बामक’ असे आहे. बेस कॅम्प ‘डोक्राणी बामा ग्लेशियर’वरून समोर डीकेडी-द्रौपदी का दांडा, चौराई की धार, माचा धार पाहायला मिळतात. हुले यांना रक्सॅक आणि इतर सामान ग्लेशियरच्या तळाशी बेस कॅम्पवर ठेवावे लागले. आणि मग बूट, क्रॅम्पोन्स, हार्नेस, रक्सॅक सोबत कॅराबिनर्स, बर्फाचे कर्मचारी आणि बर्फाची कुर्‍हाडी घेऊन चढाईसाठी तयार झाले. पहाटे सहा वाजता हुले व त्यांची टीमने माचाधार चढाईला सुरुवात केली.
दरम्यान, अनेक कठीण व अवघड चढाई आली. मात्र, ही खडतर व धोकादायक चढाई यशस्वीपणे पूर्ण केली. येथे देश-विदेशातील गिर्यारोहक हुले यांना मिळाले. परदेशातील गिर्यारोहकांनी हुले यांच्या चढाई कौशल्याचे कौतुकदेखील केले.

पर्वतावर चढून काय मिळते?
गिर्यारोहणाच्या प्रक्रियेतून तो सर केल्याच्या विजयातून अविस्मरणीय आनंद मिळतो. पर्वतीय वातावरणात व्यायामाचा आनंदसुद्धा मिळतो. प्रत्येक वेळी आश्‍चर्यचकित होऊन आत्म-शोध अधिक खोलवर आणण्याची प्रक्रियादेखील असते. प्रत्येक चढाईनंतर थोडे पुढे आपण कोण आहोत, आपण किती पुढे जाऊ शकतो? आपली क्षमता काय आहे? आपल्या तंत्राच्या मर्यादा कोठे आहेत? आपले सामर्थ्य, आपले कौशल्य, आपली गिर्यारोहणाची जाणीव यांचा शोध पूर्ण होतो, असे मॅकमोहन हुले यांनी माहिती देताना सांगितले.

या हिमतटात माझा रोमांच व अभ्यास चालू राहील. अथक प्रयत्नांनी मला ही संधी मिळाली. आर्थिक परिस्थिती नसल्याने मला क्लाइंबिंग कम्युनिटी महाराष्ट्र व माझ्या मित्रांची मदत मिळाली. पुढील मोहिमांसाठी जिल्ह्यातील दानशूर व्यक्ती, संस्था व क्रीडाप्रेमींच्या मदतीची गरज आहे.

Exit mobile version