सप्लाय बॉक्स ठरतोय मृत्यूचा सापळा

महावितरणचे दुर्लक्ष

। कोर्लई । वार्ताहर ।

मुरुड शहरातील एकदरा पुलाजवळ मुख्यरस्त्यावर महावितरणचा 440 व्होल्ट सप्लाय बॉक्स झाकण नसल्याने मृत्यूचा सापळा ठरत असून स्थानिक नागरिकांनी संबंधित महावितरणच्या अधिकार्‍यांना दूरध्वनीद्वारे कळवूनही याकडे दुर्लक्ष होत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

मुरुड शहरांमध्ये जमीनीखालून वीज पुरवठा सुरू होणार होता. कित्येक वर्षांपूर्वी त्या संदर्भात जमीनीखालून वीज वाहिन्या टाकण्यात आल्या व ठीक ठिकाणी 440 व्होल्ट सप्लाय बॉक्स बसविण्यात आले आहेत. परंतु हे सप्लाय बॉक्स गंजून त्याचे दरवाजे निखळून पडलेले आहेत. हा सप्लाय बॉक्स एकदरा पुला जवळील मुख्य रस्त्यावर आहे. या ठिकाणाहून जंजिरा किल्ला पाहण्यासाठी सतत पर्यटकांच्या व स्थानिकांच्या वाहनांची वर्दळ सुरू असते, स्थानिक नागरिक या ठिकाणाहून चालत जातात, लहान मुले चालत जात असतात, गुरेढोरे वावरत असतात. त्यामुळे हा सप्लाय बॉक्स मृत्यूचा सापळा बनला आहे.

Exit mobile version