कळंबनी येथे टँकरनी पेट घेतला

टँकरचा चालक फरार
| खेड । प्रतिनिधी ।
मुंबई-गोवा महामार्गावरील कळंबणी येथे उपजिल्हा रुग्णालयाच्या बाजूला काळकाई हॉटेलसमोर केमिकल टँकरने पेट घेतल्याची घटना रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली. आग लागताच क्षणी टँकरचे चालकानी मात्र पळ काढला. यामध्ये टँकरचे मोठे नुकसान झाले. दरम्यान, आगीचे वृत्त कळताच खेड नगरपरिषदेचा अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आणि केमिकल टँकरला लागलेली आग विझवण्याचे प्रयत्न केले. खेड नगरपरिषद अग्निशमन दलाची टीम, मदत ग्रुप खेड, रेस्क्यू टीमचे मदतकार्य यामुळे ही आग विझवण्यात यश आले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. यावेळी महामार्गावरील खोळंबलेली वाहतूक सुरळीत सुरू झाली.

Exit mobile version