कर्नाळा खिंडीत टँकर पलटी

| पनवेल | वार्ताहर |

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर पनवेलजवळील कर्नाळा खिंडीत अचानक टँकर पलटी झाल्याने महामार्ग काही काळ ठप्प झाला होता. या घटनेत टँकरचालक किरकोळ जखमी झाला असून, पनवेल तालुका पोलीस आणि पळस्पे वाहतूक शाखेच्या पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत महामार्ग वरील वाहतूक सुरळीत केली.

मुंबई-गोवा महामार्गावरील पनवेल ते पेण बाजूकडे जात असताना कर्नाळा खिंडीत टँकरचालक अनुराग रामजी यादव यांचे टँकरवरील नियंत्रण सुटल्याने डाव्या बाजूला पलटी झाला. या घटनेत टँकरचालक किरकोळ जखमी झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पनवेल तालुका पोलीस आणि पळस्पे वाहतूक शाखेच्या पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली. तसेच आपत्कालीन मोबाईल रुग्णवाहिका तात्काळ दाखल होत टँकरचालकाला प्राथमिक उपचार करत त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातामुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.

Exit mobile version