लक्ष्य नेमबाजी करंडक नवी मुंबईत रंगणार

| नवी मुंबई | वृत्तसंस्था |

भारतातील प्रतिष्ठेची स्पर्धा म्हणून ओळखली जाणारी लक्ष्य नेमबाजी करंडक येत्या 16 व 17 मार्च रोजी नवी मुंबई, पनवेल येथील कर्नाळा स्पोर्ट्स अकादमीत रंगणार आहे. एअर रायफल नेमबाजांसाठी ही स्पर्धा पर्वणी असणार आहे.

लक्ष्य शूटिंग क्लबच्या संस्थापक व अध्यक्षा याप्रसंगी म्हणाल्या, या स्पर्धेने देशातील नेमबाजांना आपल्यातील कसब दाखवता येते. पुरुष व महिला समान पातळीवर या स्पर्धेत खेळतात. त्यामुळे या स्पर्धेतील रोमांचकता आणखी वाढते. 16 व 17 मार्च रोजी या स्पर्धेची रंगत पाहायला मिळेल.

दरम्यान, लक्ष्य नेमबाजी करंडकात दरवर्षी भारतातील दिग्गज नेमबाजांचा सहभाग असतो. मागील वर्षी श्रीयांका सदांगी हिने 50 मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात पॅरिस ऑलिंपिकची पात्रता मिळवली होती. तसेच, आतापर्यंत या स्पर्धेला रुद्रांक्ष पाटील, दिव्यांश पन्वर, ऐश्‍वर्य प्रताप तोमर, दीपककुमार, मेघना सज्जनर या स्टार खेळाडूंचा सहभाग लाभला आहे. यंदाही दिग्गज नेमबाजांचा सहभाग अपेक्षित आहे. वरिष्ठस्तरावर दीड लाखाची, तर ज्युनिअरस्तरावर 75 हजार रुपयांची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.

Exit mobile version