| मुरुड | प्रतिनिधी |
सलग तीन दिवस मुरुड च्या तापमान सातत्याने घट होत आहे. त्यामुळे मुरुडच्या तापमानात कमालीची घट झाली आहे. मुरुडचा पारा 16 खाली घसरल्याने मुरुडकरांसहीत पर्यटकही गारठलेले दिसत आहेत. दिवसा कडक ऊन तर रात्री कमालीची थंडी जाणवू लागली असल्याने महाबळेश्वर सारखा अनुभव येत आहे.
दिवाळीच्या सुट्टीनंतर थंडीच्या हंगामामध्ये शालेय सहलींना सुरुवात झाली आहे. जगप्रसिद्ध जंजिरा किल्ला पाहण्यासाठी मोठ मोठ्या बसेस संपूर्ण महाराष्ट्रातून दाखल होत आहेत. मुरुड मध्ये अल्हाददायक वातावरण निर्माण झाल्याने येणाऱ्या पर्यटकांना आकर्षण निर्माण झाले आहे. मुरुडची थंडी बोचरी असल्याने स्थानिक व पर्यटन ठिक ठिकाणी शेकोटी पेटवून आनंद घेत असल्याचे दिसून येत आहेत. डोक्यावर कान टोपी, अंगात स्वेटर घालून मॉरनिंग वॉकला जाणारी नागरिक दिसत आहेत. सकाळी शाळेत जाण्यासाठी लहान मुले थंडीमुळे उठत नसल्याने आई, बाबांचा ओरडा खात असल्याचे दिसून येत आहेत.







