। नेरळ । वार्ताहर ।
तीन जिल्ह्यांमधून वाहणारी आणि लाखो लोकांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडविणारी उल्हासनदीच्या खोर्यातील उष्णतेचे प्रमाण खाली आणण्यासाठी उल्हासनदी खोरे संजीवनी अभियान आणि अश्वमेघ प्रतिष्ठान यांच्या माध्यामातून भरीव काम व्हावे यासाठी विचारमंथन सुरु झाले आहे. सगुणाबाग या कृषी पर्यटन केंद्रात हे विचारमंथन सुरु झाले असून वातावरणातील उष्णतेचे प्रमाण कमी कारणांसाठी काम करणारे तज्ज्ञ यांची प्रमुख सहभाग यात आहे.
रायगड आणि ठाणे जिल्ह्यातून वाहणार्या उल्हास नदी मुख्यतः पुणे, रायगड व ठाणे या जिल्ह्यांमधून वाहते व वसईच्या खाडीला जाऊन मिळते. या 3 जिल्ह्यांमध्ये असलेले उल्हासनदीचे खोरे अंदाजे चार हजार चौरस किमी आहे. या सर्व भौगोलिक परिसराच्या आरोग्याचा र्हास होण्याची परिसीमा गाठली आहे. 50 लाखापेक्षा जास्त नागरिक उल्हास नदीचे पाणी पिण्यासाठी आणि त्या पाण्याचा वापर शेती करून उपजीविका करण्यासाठी वापरले जाते. त्यामुळे हा जलस्रोत सातत्यपूर्वक व शाश्वतपणे वाहत राहणे अत्यंत महत्वाचे आहे. उल्हास खोर्यातील उष्णतेचे प्रमाण खाली आणण्यासाठी सगुणा रूरल फाउंडेशन सोबत उल्हास खोरे संजीवनी अभियान आणि ठाणे जिल्ह्यातील वन्यजीव रक्षक म्हणून करणार्या अश्वमेध प्रतिष्ठान यांनी हे आव्हान पेलण्यासाठी काम सुरु केले आहे. त्यासाठी पहिले चर्चासत्र आणि त्यात विचारमंथन नेरळ जवळील सगुणाबाग येथे झाले.
त्यावेळी कृषिरत्न शेतकरी शेखर भडसावळे, हैद्राबाद येथील जमिनीच्या मातीचा अभ्यास करणारे संशोधक डॉ राजे, शासनाच्या वन विभागाचे शैक्षणिक विभागाचे मुख्य सल्लागार आणि वन्य जीव अभ्यासक कौस्तुभ कुर्लेकर,पर्यावरण अभ्यासक समर्थ परब,अश्वमेध प्रतिष्ठान चे कार्यकर्ते आणि सगुणा रूरल फाउंडेशन तसेच उल्हास खोरे संजीवनी अभियानचे अनिल निवळकर,जीवशास्त्र अभ्यासक प्रा. अनुराधा भडसावळे आणि एम इंडिकेटरचे निर्माते सचिन पेके, आदी सहभागी झाले होते. दोन दिवस या सर्वांनी उल्हास नदीच्या तीन जिल्ह्याच्या खोर्यात उष्णतेचे प्रमाण खाली आणण्यासाठी काय काय करायला हवे? त्यासाठी शासनाची कशी मदत मिळवायची? यावर विचार मंथन करण्यात आले.