पंडित पाटील यांच्या उपस्थित कामाचा शुभारंभ
| पेझारी । वार्ताहर ।
आंबेपूर पेझारी येथील साई सर्वोदय समाजमंदिर नुतनीकरण कामाचा मुहुर्त दि.18 नोव्हेंबर रोजी मा.आ.पंडित पाटील, जि.प.सदस्या भावना पाटील यांच उपस्थितीत साई मंदिराचे पुजारी के.आर.पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अलिबाग पंचायत समिती सदस्या रचना थोरे पाटील, युवानेते सवाई पाटील, आंबेपूर ग्रामपंचायत सरपंच सुमना पाटील, प्रकाश म्हात्रे, अॅड.डी.आर.पाटील, मोहनराव मुंचके, संदेश पाटील, प्रमोद पाटील, अनिल पाटील, जितेंद्र पाटील, महेश पाटील, परशुराम पाटील, राजेंद्र म्हात्रे, सुरेखा मुंचके, प्राची म्हात्रे, समिक्षा चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. रायगड जिल्हा परिषदेच्या सुप्रिया पाटील अध्यक्षा असताना आंबेपूर येथे या साई मंदिराचा 20 वर्षापूर्वी जिर्णोद्धार करण्यात आला होता. परंतु मंदिराचा काही भाग जिर्ण झाल्यामुळे नुतनीकरण करणे गरजेचे झाले होते. त्यामुळे मा.आ.पंडीत पाटील यांनी आ.जयंत पाटील यांच्या आमदार निधीतून साई मंदीर नुतनीकरण करण्याचे ठरविले. त्या कामाचा मुहुर्त करण्यात आला.